Temperature : वायव्य भारताची होरपळ सुरूच; प्रयागराजमध्ये तापमान ४७.६ अंशांवर

जून महिना निम्मा संपल्यानंतरही वायव्य भारतात उष्णतेच्या तीव्र लाटेचा प्रकोप सुरूच असून लडाखपासून झारखंडपर्यंतचा भाग या लाटेने कवेत घेतला आहे.
Summer Increase
Summer Increasesakal
Updated on

नवी दिल्ली - जून महिना निम्मा संपल्यानंतरही वायव्य भारतात उष्णतेच्या तीव्र लाटेचा प्रकोप सुरूच असून लडाखपासून झारखंडपर्यंतचा भाग या लाटेने कवेत घेतला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच ते नऊ अंशांनी अधिक आहे. उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये सर्वाधिक ४७. ६ अंश कमाल तापमान नोंदविले गेले.

हिमालयातील दुर्गम भागातील नुब्रात २६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे, मॉन्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना आणखी काही दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.

दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी रात्रही उकाड्याची ठरत आहे. वायव्य-उत्तर भारतातील हरियाना, चंडीगड, दिल्ली, प.राजस्थान, प. उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशच्या बहुतेक भागांत किमान तापमानही सरासरीपेक्षा ५.१ अंशांनी अधिक असल्याने उष्ण रात्रींचा अनुभव घ्यावा लागत आहे. मध्य व पूर्व भारतात पुढील तीन दिवस तापमान अधिक राहण्याची शक्यता असून त्यानंतरच काहीसा दिलासा मिळू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करणाऱ्या पंजाब व हरियानातही उष्णतेचा प्रकोप कायम असून पंजाबमधील भटिंडात सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. पंजाब-हरियानाची संयुक्त राजधानी असणाऱ्या चंडीगडमध्ये ४४.५ अंश सेल्सिअस होते.

दिल्लीत विजेची विक्रमी मागणी

उष्णतेमुळे दिल्लीत विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून मंगळवारी विजेची विक्रमी ८,६४७ मेगावॉट मागणी नोंदविली गेली. यापूर्वी २९ मे रोजी नोंदविलेला ८,३०२ मेगावॉटचा विक्रम आज मोडला केला, अशी माहिती 'िडस्कॉम’च्या अधिकाऱ्यांनी दिली. उकाड्यापासून सुटका करण्यासाठी एसी व कुलरच्या वापरात प्रचंड वाढ झाल्याने विजेची मागणीही सातत्याने वाढत आहे.

सरासरीपेक्षा पाच अंश अधिक तापमान

उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड व बिहार

राजस्थानात तीव्रता वाढली

राजस्थानात उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढली असून अनेक ठिकाणी सोमवारी कमाल तापमान आधीच्या दिवशीच्या तुलनेत एक ते सहा अंशांनी अधिक होते. गंगानगर ४६.२ अंश कमाल तापमानासह राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले.

दिल्लीपेक्षा मुंबई अधिक थंड

मुंबईत पावसाने पाठ फिरवली असली, तरी बऱ्याचदा ढगाळ वातावरण असते. यामुळे कमाल तापमानात घट झाली असून दिल्लीपेक्षा अधिक गारवा मुंबईत जाणवत आहे. जूनच्या मध्यात, मुंबई उत्तर भारताच्या तुलनेत अजूनही दहा अंशांनी थंड आहे, असे निरीक्षण मुंबई रेन्स संस्थेने नोंदवले आहे. नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून तापमान दुपार होण्यापूर्वीच ४३ अंश सेल्सिअसला स्पर्श करते, तर मुंबईतील कमाल तापमान मात्र ३४-३५ अंशांच्या आसपास आहे, असे संस्थेने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()