पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार व्हावा; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन

गोव्यावर पोर्तुगीजांनी सुमारे साडे चारशे वर्षे राज्य केलं.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant
Updated on

नवी दिल्ली : गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार व्हायला हवा, असं आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आहे. मंदिरांकडे पर्यटकांनी आकर्षित व्हावं ही जबाबदारी राज्य सरकारची असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. (temples destroyed by Portuguese should be recunstructed appeal of Goa CM Pramod Sawant)

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या गोव्यातील मंदिरांचा जिर्णोद्धार व्हावा, जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत पर्यटक केवळ समुद्र किनाऱ्यांच्या आकर्षणानंच गोव्यात येत राहतील. त्यामुळं हे आपलं कर्तव्य आहे की, त्यांना आपल्याला मंदिरांमध्ये आणता आलं पाहिजे. मंदिरांच्या जिर्नोद्धारांसाठी आम्ही बजेटमध्ये यापूर्वीच तरतूद केलेली आहे.

Goa CM Pramod Sawant
"धार्मिक शाळांमध्ये तेव्हाच प्रवेश असावा जेव्हा मुलं स्वतः निर्णय घेऊ शकतील"

यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी उपस्थित केलेल्या समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर बोलताना प्रमोद सावंत म्हणाले, गोव्याच्या स्वातंत्र्यापासूनच आम्ही समान नागरी कायद्याचं पालन करत आहोत. त्यामुळं मला वाटतं की इतर राज्यांनीही याची अंमलबजावणी करायला हवी. गेल्या ६० वर्षात गोव्यानं जे कामावलं नाही ते आम्ही सन २०१२ ते २०२२ या काळात कामावलं. त्यानंतर आता गोव्याचा लवकरच उत्कृष्ट राज्यांच्या यादीत समावेश होणार आहे, असंही सावंत यावेळी म्हणाले.

Goa CM Pramod Sawant
'उंटाच्या तोंडात जिरे'; व्हॅट कमी केल्यानंतर फडणवीसांची टीका

दरम्यान, गोव्यात सुमारे साडे चारशे वर्षे पोर्तुगीजांनी राज्य केलं आहे. गोवा ही पोर्तुगीजांची भारतातील वसाहत होती. वास्को दी गामा या खलाश्यानं भारतात पोहोचण्याचा समुद्री मार्ग शोधल्यानंतर पुढील सात वर्षातच पोर्तुगीज गोव्यात अर्थात भारतीय भूमीवर दाखल झाले. सन १५०५ ते सन १९६१ पर्यंत त्यांचं भारतात वास्तव्य कायम होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.