देवदेवतांच्या नावावर होणार मंदिरांची जमीन; सरकारने सुरू केली प्रक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Temple
TempleEsakal
Updated on

नवी दिल्ली : मंदिराच्या पुजाऱ्याऐवजी देव/देवताच मंदिराच्या जमिनीचे मालक असणार आहेत, यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कायदा मंत्री प्रमोद कुमार यांनी शुक्रवारी दिली आहे. तसेच, 6 सप्टेंबर 2021 रोजी जारी केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बिहार सरकार अंमलबजावणी करणार असल्याचेही प्रमोद कुमार यांनी सांगितले आहे. (Temples Land Now Registered On God's Name In Bihar)

Temple
मुख्यमंत्री खरे असल्याचं ग्रामपंचायत स्पष्ट करू शकली नाही - सोमय्या

कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही की, महसूल रेकॉर्डमध्ये पुजारी किंवा व्यवस्थापकाचे नाव नमूद करणे आवश्यक असल्याचा आदेश न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (Supreme Court Bench) दिला होता. यावेळी खंडपीठाने रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाचाही हवाला देत आपल्या निर्णयाच्या बाजूने सांगितले होते की, मंदिरातील देवता जमिनीचा मालक असतो आणि मालमत्ता त्याच्या नावावर ठेवता येते असे म्हटले होते.

Temple
CAA Protest : UP सरकारकडून वसूली नोटिसा मागे घेण्याचा निर्णय

दरम्यान, अनधिकृत दाव्यांपासून मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी कायदा विभाग लवकरच पुजाऱ्यांची नावे महसूल रेकॉर्डमधून काढून टाकण्यासाठी एक परिपत्रक जारी करणार असल्याचे कुमार यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()