इंफाळ : मणिपूरमधील जिरिबम येथील मैतेई समुदायातील तीन महिला आणि तीन बालके यांचे मृतदेह सापडल्याने शनिवारी संध्याकाळपासून येथे नव्याने हिंसाचार उसळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.