उदयपूरमध्ये हिंसाचार भोवला! पर्यटन विभागाला मोठा फटका

अनेक पर्यटकांकडून हॉटेलमधील आरक्षण रद्द
Tensions in Udaipur hit tourism
Tensions in Udaipur hit tourism
Updated on

उदयपूर - कन्हैयालाल हत्याप्रकरणामुळे उदयपूरमधील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. उदयपूरमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांपैकी निम्म्याहून अधिक जणांनी पुढील दोन महिन्यांच्या कालावधीतील हॉटेलमधील आरक्षणे रद्द केली असल्याची माहिती येथील हॉटेल व्यावसायिक संघटनेने दिली.

उदयपूर हे शहर निसर्ग, वास्तू, हस्तकला यांमुळे पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे शहर आहे. पर्यटन आणि त्यावर आधारित व्यवसाय हेच उदयपूर येथील लोकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. हे देशातील सर्वाधिक पसंतीच्या वेडिंग डेस्टिनेशनपैकी एक आहे. येथील वातावरण कायमच शांत असल्याने भारतीय पर्यटकांबरोबरच मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक देखील येथे येतात. दागिने, हस्तकला आणि कापड यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उदयपूरमधील सर्वाधिक गजबजलेल्या मालदास बाजारपेठेतच कन्हैयालाल यांची हत्या झाल्याने शहरातील शांततेला तडा गेला आहे.

संचारबंदी शिथिल

गेल्या २४ तासांत उदयपूरमध्ये कोणतीही अनुचित घटना न घडल्याने आणि जनजीवन देखील पूर्वपदावर येत असल्याने रविवारी १० तासांकरता शहरातील संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.