यासिन मलिक हिटलर मोदींना आव्हान देणारा सर्वात धाडसी व्यक्ती : मुशाल मलिक

Yasin Malik Mushaal Malik
Yasin Malik Mushaal Malikesakal
Updated on
Summary

यासिन मलिकला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.

नवी दिल्ली : काश्मीरमधील (Jammu Kashmir) फुटीरतावादी नेता यासिन मलिक (Yasin Malik) याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. एनआयए (NIA) न्यायालयानं आज (ता. २५) यासिन मलिकला शिक्षा सुनावली. मलिकनं याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी यासिन मलिकच्या पत्नीनं आपली प्रतिक्रिया दिलीय.

यासिनची पत्नी मुशाल हुसैन मलिकनं (Mushal Hussain Malik) अत्यंत जहरी विधान करत न्यायालयाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुशाल मलिकनं निकालापूर्वी ट्विट करत लिहिलंय की, 'भारताचं कांगारू न्यायालय (Indian Court) निकाल देणार आहे. यासिन मलिक हा या काळातील हिटलर मोदींना आव्हान देणारा सर्वात धाडसी व्यक्ती आहे. आम्ही सगळे यासीन मलिक आहोत, असं तिनं नमूद केलंय.

Yasin Malik Mushaal Malik
सैनिकांवर गोळीबार ते गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण; जाणून घ्या यासिनचं दहशतवादी कृत्य

यासिन मलिकला नेहमीच 9 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याला आयपीसी आणि UAPA च्या कलम 121 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. याशिवाय 10 वर्षांच्या कारावासाच्या 4 शिक्षाही सुनावण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षा एकाच वेळी चालतील आणि सर्वात मोठी शिक्षा जन्मठेपेची आहे. अशाप्रकारे यासिन मलिकला आयुष्यभर तुरुंगात राहावं लागणार आहे. दरम्यान, हवाई दलाचे अधिकारी रवी खन्ना यांची पत्नी निर्मल खन्ना हिचंही वक्तव्य समोर आलं असून, ज्यांच्या हत्येत यासिन मलिकचाही सहभाग होता. निर्मला खन्ना म्हणाल्या की, यासीन मलिकनं कोणतीही शिक्षा न होता 32 वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला आहे. त्याला आणखी काय आराम हवा आहे?, असं त्यांनी नमूद केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()