अटलजींनी दिलेला पासपोर्ट घेऊनच यासिन केंब्रिजला गेला होता, कोर्टात काय घडलं?

एनआयएने यासिनला फाशीची शिक्षा मागितली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसून येत होती.
Yasin Malik
Yasin MalikSakal
Updated on

नवी दिल्ली : टेरर फंडिंग प्रकरणी न्यायालयाने यासिन मलिकला (Yasin Malik) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) न्यायालयाकडे केली होती. दरम्यान, कोर्टात शिक्षेवर झालेल्या चर्चेदरम्यान यासिन मलिक पूर्णपणे शांत दिसला. एवढेच नव्हे तर, एनआयएने यासिनला फाशीची शिक्षा मागितली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसून येत होती. यानंतर न्यायालयाने यासिनला बाजू मांडण्यास सांगितले. यावेळी यासिन मलिक कोर्टात काय सांगितले ते जाणून घेऊया? (NIA Court Sentences Yasin Malik To Life Imprisonment )

Yasin Malik
Life Imprisonment : नेमकी किती वर्षांची शिक्षा? आजीवन कारावास की १४ वर्ष?

NAI ने कोर्टात काय युक्तिवाद केला?

2017 मध्ये एनआयएने यासिन मलिकविरोधात टेरर फंडिंगचा (Terror Funding) गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून या प्रकरणाची पतियाळा न्यायालयात सातत्याने सुनावणी सुरू होती. एनआयएने सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. देशात दहशतवादी घटनांना प्रोत्साहन देण्यासाठी यासिन मलिकला पाकिस्तानसह जगातील अनेक देशांकडून पैसे मिळत असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले. या पैशातून देशात अनेक मोठ्या दहशतवादी घटना घडल्या. एनआयएने यासिनवरील प्रत्येक आरोपाचे पुरावे सादर केले. त्यानंतर यासिन मलिकने गुन्हा कबूल केला. यानंतर एनआयएने यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

Yasin Malik
सैनिकांवर गोळीबार ते गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण; जाणून घ्या यासिनचं दहशतवादी कृत्य

काय म्हणाला यासिन मलिक कोर्टात?

यासिनचे वकील फरहान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, एनआयएच्या मागणीनंतर न्यायालयाने यासिन मलिकला बोलण्यास सांगितले. तेव्हा यासिन म्हणाला की, 'मी गेली 28 वर्षे अहिंसेचे राजकारण करत आहे. या 28 वर्षात कोणत्याही हिंसक घटनेत माझा सहभाग नाही. एनआयए अशी कोणतीही घटना सांगू शकते ज्यात माझा सहभाग आहे? मी देशाच्या सात पंतप्रधानांसोबत काम केले आहे. गुजराल ते अटलबिहारी वाजपेयी यात सहभागी असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी यांनीच मला पासपोर्ट दिला होता. त्यानंतर मी हार्वर्डला गेलो. तिथे मी व्याख्याने दिली. हिंसाचार माझे काम असेल तर, मी हार्वर्डला का जाईन? असा प्रश्नदेखील त्याने यावेळी उपस्थित केला. देशाच्या पंतप्रधानांसह मी परिस्थिती सुधारावी, असा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मी महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावर चालत असल्याचे यासिनने न्यायालयात सांगितले.

Yasin Malik
यासिन मलिक-मनमोहन सिंग यांचा फोटो व्हायरल, काय आहे त्या मागचं सत्य?

यासीन पुढे म्हणाला, 'शिक्षेवर मी काहीही बोलणार नाही. मला जेव्हा जेव्हा विचारले गेले तेव्हा मी आत्मसमर्पण केले. आता न्यायालयाने जी काही शिक्षा द्यावी लागेल ती द्या... मी काहीही बोलणार नाही. पण प्रामाणिकपणे द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.