जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील (Kupwada operation) केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळून (एलओसी) भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतीय लष्कराने ठार (Terrorists killed) केले. भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानवर दोन्ही लष्करांमध्ये सुरू असलेल्या युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानला (Pakistan) हॉटलाइनवर संदेश पाठवत ‘दहशतवादीला ठार केले, मृतदेह घेऊन जा’, असे म्हटले.
एक जानेवारी रोजी कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी किंवा बॅट (बॉर्डर ॲक्शन टीम) टीमद्वारे कारवाईचा प्रयत्न झाला. नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या सैन्याने केलेल्या तत्काळ कारवाईने हा प्रयत्न हाणून पाडला आणि दहशतवाद्याचा खात्मा केला. नंतर दहशतवाद्याची पाकिस्तानी नागरिक मोहम्मद शब्बीर मलिक म्हणून ओळख झाली, असे कुपवाडा येथे एका मीडिया ब्रीफिंगमध्ये जीओसी २८ विभागाचे मेजर जनरल अभिजित एस. पेंढारकर यांनी सांगितले.
आम्ही हॉटलाइनवर पाकिस्तानी लष्कराशी संपर्क साधला. त्यांना मृत व्यक्तीचा मृतदेह परत घेण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बॅट (बॉर्डर ॲक्शन टीम) हे नियमित पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी यांचे मिश्रण असल्याचे म्हटले जाते. जे सीमेवर भारतीय सैन्यावर हल्ले करण्यासाठी ओळखले जातात. पाकिस्तानने (Pakistan) नेहमीच हे आरोप फेटाळले आहेत, असेही पेंढारकर म्हणाले.
पाकिस्तानी (Pakistan) राष्ट्रीय ओळखपत्र आणि लसीकरण प्रमाणपत्रावरून मोहम्मद शब्बीर मलिकची ओळख पटली. तपासात शब्बीर नावाचा टॅब परिधान केलेल्या लष्कराच्या गणवेशातील घुसखोराचे छायाचित्र देखील होते. घुसखोर किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही नापाक कारवायांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने या ठिकाणावर पाळत ठेवली आहे, असेही ते म्हणाले.
अस केलं ठार
पठाणी सूट आणि काळा जॅकेट घातलेला एक सशस्त्र घुसखोर शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागातून नियंत्रण रेषेपलीकडे फिरत असल्याचा दिसला. घुसखोर कोणत्या मार्गाने जाऊ शकतो त्यावर लक्ष ठेवले होते. दुपारी चार वाजेपर्यंत हालचाली सुरू होत्या. योग्य वेळी हल्ला करण्यात आला आणि दहशतवाद्याला ठार (Terrorists killed) केले. त्याच्याजवळून एक एके-47 आणि सात ग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला, असे पेंढारकर म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.