Jammu and Kashmir: एका दहशतवाद्याचा खात्मा, 2 नागरिक जखमी; जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसात तिसरा हल्ला

Terrorists open fire at Army base: कथुआ जिल्ह्यातील हिरानगर भागात दहशतवाद्यांनी एका घरावर बेछूट गोळीवार सुरू केला.
Army
Army
Updated on

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. गेल्या तीन दिवसात दहशतवाद्यांनी तिसरा हल्ला केला आहे. कथुआ जिल्ह्यातील हिरानगर भागात दहशतवाद्यांनी एका घरावर बेछूट गोळीवार सुरू केला. यात दोन रहिवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. शिवाय यावेळी भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले होते. यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सईदा सखल गावातील एका रहिवाशाने गोळीबार ऐकला आणि त्याने लष्कराला याबाबत माहिती दिली. त्यानंतर लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात दोन ते तीन दहशतवाजी लपून बसले आहेत. गोळीबार करून दहशतवादी जंगलात पळून गेले आहेत. सीमा सुरक्षा बल आणि जम्मू पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरु केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

Army
Manchar News : डॉ. कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा 'भावी आमदार' असा उल्लेख करताच ठाकरे शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून घातला गोंधळ

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, 'आंतरराष्ट्रीय सीमेवर असणाऱ्या एका घरावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे. लष्करी अधिकाऱ्यांशी मी संपर्कात आहे. याशिवाय ज्या व्यक्तीच्या घरावर हल्ला झाला, तो व्यक्ती देखील फोनवरुन संपर्कात होता. संयुक्त मोहीम राबवण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू असून मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.'

एका घरावर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी एका लष्करी चौकीवर हल्ला केल्याची माहिती आहे. यात, दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या, भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

Army
New Army Chief: जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवे लष्कर प्रमुख; मनोज पांडे यांच्याकडून घेणार पदभार

गेल्या काही दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. तीनच दिवसांपूर्वी रईसी जिल्ह्यामध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यात १० लोकांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ऐ-तयब्बाच्या एका आत्मघातकी संघटनेने घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाकिस्तानकडून पुन्हा कुरापती सुरु झाल्याचं दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.