उरी सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईकचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, केंद्रातील भाजप सरकारच्या 10 वर्षात "दहशतवादी त्यांच्याच घरात मारले जात आहेत"
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधानांनी त्यांच्या सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांवर प्रकाश टाकला आणि एनडीएच्या राजवटीत जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आल्याचे सांगितले.
आज देशात भक्कम सरकार आहे. हे भक्कम मोदी सरकार दहशतवाद्यांना त्यांच्याच घरात घुसून मारत आहे. युद्धक्षेत्रातही भारतीय तिरंगा सुरक्षिततेचे प्रतिक बनला आहे. सात दशकांनंतर जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आले आणि तिहेरी तलाकविरोधात कायदा करण्यात आला. आमच्या सरकारने संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षणाची हमी दिली आणि सर्वसामान्य वर्गातील गरीबांनाही 10 टक्के आरक्षण देण्याचे काम केले, असे पंतप्रधान म्हणाले.
देशात जेव्हा-जेव्हा कमकुवत सरकार आले तेव्हा त्याचा फायदा शत्रूंनी घेतला आहे, असेही ते पुढे म्हणाले.
या प्रचार सभेत काँग्रेस पक्षावर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसच्या राजवटीत जवानांकडे बुलेटप्रूफ जॅकेटही नव्हती. शत्रूच्या गोळ्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य व्यवस्था नव्हती. भाजपने भारतातच बनवलेली बुलेटप्रूफ जॅकेट जवानांना दिली. ज्यामुळे आपल्या जवानांचे प्राण वाचले. आज आधुनिक रायफल्सपासून ते लढाऊ विमाने आणि विमानवाहू जहाजांपर्यंत सर्व काही देशातच बनवले जात आहे."
उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या पाच जागा असून, राज्यात एकाच टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
एनडीए ने टिहरी गढवाल, गढवाल, अल्मोरा, नैनिताल-उधमसिंग नगर आणि हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे माला राज्य लक्ष्मी शाह, अनिल बलुनी, अजय टमटा, अजय भट्ट आणि त्रिवेंद्र सिंह रावत यांना उमेदवारी दिली आहे.
तर इंडिया आघाडीने टिहरी गढवाल, गढवाल, अल्मोरा, नैनिताल-उधमसिंग आणि हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे जोतसिंग गुंटसोला, गणेश गोदियाल, प्रदीप टमटा, प्रकाश जोशी आणि वीरेंद्र रावत यांना उमेदवारी दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.