वॉशिंग्टन- कोरोनाच्या काळात लोकांना घरुन काम करण्याची मुभा देण्यात आली होती. अनेकांना त्यामुळे वर्क फ्रॉम होम करण्याची सवय लागली. वर्क फ्रॉम होम चांगले की वाईट हा चर्चेचा विषय आहे. पण, अमेरिकेतील टॅक्ससमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ एका महिलेवर आली आहे. (Texas man made almost 2 million doller by illegally trading on his wife conversations with her working from home)
पतीने आपल्या पत्नीच्या वर्क फ्रॉम होमचा चुकीचा फायदा घेतला आहे. पतीने या माध्यमातून दोन मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १७ कोटी रुपये कमावले आहेत. पत्नीला याची माहिती मिळताच तिला धक्का बसला. पत्नीने त्वरित पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे पतीविरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे. याशिवाय पत्नीने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय देखील घेतला आहे.
महिला एक ट्रेंडिग एजेंट आहे. तिचे वर्क फ्रॉम होम सुरु होते. यावेळी महिला आपल्या क्लाईंटसोबत बोलायची. यावेळी पती दुसऱ्या खोलीतून तिचे आणि क्लाईंटचे बोलणे चोरुन ऐकायचा. चर्चेमध्ये ऐकलेल्या माहितीच्या आधारे तो चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग करायचा. विशेष म्हणजे पत्नीला याबाबत काहीही माहिती नव्हती. काही काळाने पतीने स्वत: आपल्या कृत्याची माहिती महिलेला दिली आणि प्रकरण समोर आले.
माहितीनुसार, पत्नीला सर्व प्रकार कळताच तिने पतीला घराबाहेर काढले. शिवाय त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. महिलेने याची माहिती तिच्या कंपनीला देखील दिली. त्यानंतर कंपनीने महिलेला कामावरुन काढून टाकले आहे. पण, महिलेविरोधात चुकीच्या पद्धतीने ट्रेंडिग केल्याचा कोणाताही पुरावा नाही. त्यामुळे तिच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
पतीला मात्र मोठा धक्का बसला आहे. पत्नीने पतीपासून घटस्फोट घेतला आहे. शिवाय पतीविरोधात कारवाई सुरु करण्यात आलीये. तडजोड म्हणून पतीने ट्रेडिंगमधून कमावलेले पैसे परत करण्याची तयारी दाखवली आहे. शिवाय तो दंड भरण्यास देखील तयार झाला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.