महाभारत एका स्त्रीमूळे घडले असे नेहमीच म्हटले जाते. कारण, महाभारतात कौरवांसोबतच्या द्युत खेळात पांडवांनी पत्नी द्रौपदीला पणाला लावले आणि हारले. त्यावेळी भरसभेत तिचे वस्त्रहरण करण्यात येत होते. ते भगवान कृष्णांनी थांबवले. मात्र, खऱ्या आयुष्यातही एका स्त्रीला भर विधानसभेत वस्त्रहरणाला सामोरे जावे लागले आहे. कोण होती ती स्त्री आणि काय होते प्रकरण पाहुयात.
आज दिवंगत अभिनेत्री आणि राजकारणी जे.जयललिता यांचा स्मृतीदीन आहे. जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांचे निधन झाले. जयललिया यांनी आपले शालेय शिक्षण चैन्नईतील बिशप कॉटन गर्ल्स आणि चर्चपार्क कॉन्वेन्ट येथे झाले. जयललिता यांनी भारतनाट्यम् शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांना कथ्थक, मोहिनी अट्टम आणि मणीपुरी हे नृत्यप्रकारही येत होते.
चित्रपटसृष्टी आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. जयललिता यांनी 1968 मध्ये धर्मेंद्रबरोबर 'इज्जत' या एकमेव हिंदी चित्रपटात काम केले होते. 1965 तो 1980 च्या काळात त्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणार्या अभिनेत्री होत्या. 140 चित्रपटात त्यांनी काम केले. त्यापैकी 120 सुपरहीट झाले. 1960 ते 70 च्या दशकात एम.जी. रामचंद्रन यांच्यासोबत अनेक चित्रपटात त्यांची जोडी हीट ठरली. 1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एमजीआर यांनी जयललीता यांना अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश दिला.
जे. जयललिता दक्षिण भारतातील राजकारणातील एक मजबूत नेत्या होत्या. त्यांचा दबदबा दिल्लीपर्यंत होता. त्यांना एकेकाळी किंगमेकर म्हटले जात होते. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. पण हे मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम या पक्षाचे प्रमूख एमजीआर यांचा वरदहस्त जयललिता यांच्यावर होता. एमजीआर हे जयललिता यांचे राजकीय गुरू होते. त्यामूळे पक्षातील अतर महत्त्वाचे नेते जयललिता यांच्यावर नाराज होते. त्यांची पक्ष प्रमुखांशी असलेले जवळीक त्यांना खटकत होती.
1984 व 1989 मध्ये जयललिता यांनी राज्यसभेत अण्णाद्रमुकमध्ये खासदार म्हणून काम केले. 1984 मध्ये एमजीआर आजारी पडल्यावर जयललिता यांनी मुख्यमंत्रिपद मिळविण्याच्या प्रयत्न केल्याने अण्णाद्रमुकमध्ये फूट पडली. एका गटाने रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी यांना पाठिंबा दिला होता. 1989 मध्ये तमिळनाडू विधानसभेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होण्याचा मान त्यांना मिळाला. त्याच वर्षी अण्णाद्रमुकच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले व एकमताने जयललिता यांना नेता म्हणून स्वीकारण्यात आले.
एमजीआर यांच्या मृत्यूनंतर जयललिता यांना अंतिम दर्शनही घेता आले नाही. याला कारणीभूतही ते नेतेच होते. त्यांनी जयललिता यांना दर्शनापासून अडवले, मी तिथेच एक दोन नव्हे तर तब्बल १६ तास उभी होते असे, जयललिता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
जयललिता यांनी एमजीआर यांच्या पार्थिवासोबत बसण्यासाठी वाहनात चढण्याचा प्रयत्न केला. पण, नेते डॉ.के.पी.रामलिंगम यांनी त्यांना मारहाण करून धक्काबुक्की केली. यासोबतच एमजीआर यांच्या पत्नी व्हीएन जानकी यांच्या पुतण्यानेही त्यांच्यावर हल्ला केला होता. या अशा घटना एकामागून एक जयललिता यांच्या राजकीय कारकिर्दीला आणखी पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरत होत्या.
तो संसदेतील दिवस
वर्ष होते 1989 आणि महिना होता मार्च. जेव्हा तामिळनाडू विधानसभेत जयललिता यांच्या पक्षाचे सदस्य आणि करुणानिधींच्या DMK पक्षाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी करूणानिधी हे मुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्रीही तेच होते. ते बजेट सादर करत होते त्यावेळी जयललिता यांनी त्यांचा विरोध केला. अशात कुणीतरी करूणानिधी यांच्यावर फाइल फेकली आणि त्यांचा चष्मा तुटला. दोन पक्षांमध्ये हाणामारी सुरू झाला. DMK नेत्यांनी जयललिता यांना घेरलं.
करूणानिधींना जयललिता यांनी गुन्हेगार म्हटल्यानंतर करुणानिधींनी त्यांना आक्षेपार्ह शब्दात हाक मारली. नंतर जयललिता यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्या साडीही फाडली आणि त्यांच्या डोक्यातही मारले होते.
हाच तो प्रसंग होता जेव्हा जयललिता यांना त्या घटनेचा बदला घेण्याची प्रेरणा दिली. आणि त्यानंतरच तामिळनाडूतील राजकारणात जयललिता यांचा उदय झाला. या अपमानानंतरच जयललिता यांनी मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत यायचे ठरवले असल्याचा पवित्रा घेतला. बरोब्बर दोन वर्षांनंतर त्यांनी सत्तांतर घडवत तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
1995 मध्ये त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. सर्वात लहान वयात मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. 1996 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2001 मध्ये त्या दुसर्यांदा मुख्यमंत्री झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध निकाल दिल्याने मुख्यमंत्रिपद सोडणे भाग पडले. 2003मध्ये सर्व खटल्यांमधून निर्दोष सुटल्यावर त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. 2011 मध्ये त्या तिसर्यांदा मुख्यमंत्री झाल्या. 2014मध्ये त्यांना 4 वर्षांची शिक्षा झाल्याने पद सोडावे लागले.
2015मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यावर त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. 2016 मध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या. 32 वर्षात पुन्हा सत्तेवर येणार्या त्या पहिल्याच मुख्यमंत्री ठरल्या. मुख्यमंत्रिपदासाठी अवघे एक रुपया वेतन घेत होत्या. अशा या हरहुन्नरी अभिनेत्री आणि तितक्याच मुरलेल्या राजकारणी जयललिता यांचे दिर्घ आजाराने निधन झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.