Navy: 'देश के दुश्माको की खैर नही' आता नौदलाला मिळणार ‘तेजस’चे बळ अन्..

Tejas' fighter jets | लष्कराची सज्जता वाढविण्याच्या दृष्टीने वरील प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यासाठी सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.
tejas and prachanda
tejas and prachanda Esakal
Updated on

भारतीय नौदलासाठी ९७ ‘तेजस’ लढाऊ विमाने आणि १५० ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या (डीएसी) बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘सुखोई-३०’ लढाऊ विमानांच्या ताफ्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. लष्कराची सज्जता वाढविण्याच्या दृष्टीने वरील प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यासाठी सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.

tejas and prachanda
Modi Tejas: ढगात कुणाला टाटा...? मोदींच्या तेजस उड्डाणावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मंजूर प्रस्तावांची सविस्तर माहिती लवकरच दिली जाणार आहे. दरम्यान नौदलाच्या ताफ्यात एक विमानवाहू नौका समाविष्ट केली जाणार असल्याचे समजते.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून ‘तेजस’ लढाऊ विमाने तसेच प्रचंड हेलिकॉप्टरची निर्मिती केली जाते. हवाई दलाच्या ताफ्यात सध्या ८३ तेजस विमाने आहेत. नव्याने खरेदी केल्या जाणाऱ्या ‘तेजस’ विमानांसाठी सुमारे ६५ हजार कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.

tejas and prachanda
PM Modi Tejas : अन् आत्मविश्वास वाढला.. मोदी बनले तेजस फायटर प्लेनचे पायलट; सांगितला थरारक अनुभव

हा सौदा मार्गी लागला तर लढाऊ विमानांच्या खरेदीसाठीचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा सौदा ठरेल. नौदलाच्या ताफ्यात जी नौका सामील होणार आहे, त्या नौकेवर १४ विमाने सामावून घेण्याची क्षमता असेल.

देशात बनवण्यात आलेली पहिली विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत गतवर्षी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली होती. कोचीन शिपयार्डकडून या नौकेची बांधणी करण्यात आली होती.

चीन आणि पाकिस्तानकडून वाढत असलेला धोका लक्षात घेऊन लष्कराची सज्जता वाढवली जात आहे. संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या बैठकीत नव्याने मंजूर करण्यात आलेले प्रस्ताव हे त्याचे द्योतक असल्याचे मानले जात आहे.

tejas and prachanda
Tejas: कंगनाचा फ्लॉप 'तेजस' पाहून मुख्यमंत्री योगींच्या डोळ्यात अश्रू! फोटो शेअर करत अभिनेत्रीने मानले आभार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()