हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: दोषीला न्यायालय संध्याकाळी पाचला सुनावणार शिक्षा

hearing on hinghanghat professor burned case from tomorrow
hearing on hinghanghat professor burned case from tomorrow Sakal
Updated on

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालय दोषीला संध्याकाळी पाचला शिक्षा सुनावली जाणार आहे. वर्ध्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलं आहे, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालय आज निकाल देणार आहे. गतवर्षी 3 फेब्रुवारी 2020 आरोपी विकेश नगराळेने याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. त्यानंतर 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता.

गुन्हाचे स्वरुप लक्षात घेता सरकारने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर कोर्टामध्ये विविध पुरावे तसेच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. उपलब्ध पुराव्यांवरून आरोपीवरील आरोप सिद्ध झाले असून आज संध्याकाळी पाच वाजता न्यायालय आरोपीला शिक्षा सुनावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.