नवी दिल्ली- अलाहाबाद हायकोर्टाने गुरुवारी श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराजवळील शाही इदगाह परिसराचे सर्व्हेक्षण करण्याची परवानगी दिली आहे. याआधी कोर्टाने काशीमधील मंदिराचे सर्व्हेक्षण करण्याची परवानगी दिली होती, त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील मथुरामधील मंदिराच्या सर्व्हेक्षणालाही मंजुरी मिळाली आहे. (The Allahabad High Court on Thursday allowed surveying the Shahi Idgah complex adjacent to the Shri Krishna Janmabhoomi Temple in Uttar Pradesh Mathura)
अलाहाबाद हायकोर्टाने गुरुवारी श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह परिसर वादात हिंदू पक्षकाराला मोठा दिलासा दिला. अनेक दिवसांपासून हिंदू पक्षकार शाही इदगाह परिसराचे सर्व्हेक्षण व्हावे याची मागणी करत होते. हिंदू पक्षकार जिल्हा कोर्टापासून हायकोर्टापर्यंत गेले होते. कोर्टाने १८ याचिकांवर सुनावणी करताना हा निर्णय दिला.
श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह यावरुन गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. कोर्टाने सर्व्हेक्षणासाठी एक कमिशनर नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यांच्या माध्यमातून परिसरकाचे सर्व्हेक्षण केले जाईल. कमिशनरच्या टीममध्ये किती सदस्य असतील याबाबत कोर्ट लवकरच निर्देश देईल.
ज्ञानवापीनंतर मथुराच्या शाही इदगाद मश्चिद परिसराचे सर्व्हेक्षण करण्यासाठी हिंदू पक्षकाराने याचिका दाखल केली होती. यावर जिल्हा कोर्टासह हायकोर्टामध्ये अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. ६ डिसेंबरला कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर गुरुवारी कोर्टाने आपला निर्णय दिलाय.
हायकोर्टाच्या निर्णयानंतर हिंदू पक्षकाराचे वकील विष्णु शंकर जैन म्हणाले की, कोर्टाने आमचे निवेदन स्वीकारले आहे. आम्ही एका न्यायिक आयुक्ताकडून शाही इदगाह मश्चिदचे सर्व्हेक्षण करण्याची मागणी केली होती. यासंबधीची रुपरेषा १८ डिसेंबरला नक्की केली जाईल. शाही इदगाह मश्चिद पक्षकाराची याचिका फेटाळली आहे.
शाही इदगाह मश्चिद परिसदात अनेक हिंदू मंदिराचे चिन्हं आणि प्रतीकं आहेत. त्यामुळे वास्तव जाणून घेण्यासाठी एका समितीची नियुक्ती आवश्यक होती. त्यानंतर कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला, असं विष्णु शंकर जैन म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.