Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मंजूर केलेल्या माफीला सुप्रीम कोर्टात आव्हान

सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी या प्रकरण सूचीबद्ध करण्याचा विचार करू असे म्हटले आहे
Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मंजूर केलेल्या माफीला सुप्रीम कोर्टात आव्हान
Updated on

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी या प्रकरण सूचीबद्ध करण्याचा विचार करू असे म्हटले आहे.

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना सोडण्याच्या गुजरात सरकारने दिलेल्या माफीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

वकील अपर्णा भट यांनी मंगळवारी सकाळी सरन्यायाधीशांसमोर या प्रकरणाचा उल्लेख करून बुधवारी तातडीने सुनावणीची मागणी केली. एन व्ही रमणा यांनी या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शवली, असे LiveLaw अहवालात म्हटले आहे.

गुजरातच्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्व 11 आरोपींना तुरुंगातून मुक्त करण्यात आले आहे. गुजरातमधील भाजप सरकारच्या शिक्षा माफ करण्याच्या धोरणाअंतर्गत सर्व आरोपींना सोडण्यात आले आहे. 2004 साली या आरोपींना अटक करण्यात आली होती. तर 2008 मध्ये या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली होती.

Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मंजूर केलेल्या माफीला सुप्रीम कोर्टात आव्हान
Bilkis Bano Case: "काहीतरी चुकतंय"; आरोपींच्या सत्कारानंतर जावेद अख्तर संतप्त

सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची सुटका केल्यानंतर देशभरातून अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. बिल्किस बानो यांनीदेखील “आपल्यावर अत्याचार व आपल्या सात कुटुंबीयांची हत्या करणाऱ्या 11 दोषींच्या जन्मठेपेची शिक्षा शिथिल करत त्यांना मुक्त केल्याने मी सुन्न झाले आहे. न्यायव्यवस्थेवरील माझ्या श्रद्धेस धक्का पोहोचला असून, ती डळमळली आहे,’’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यादरम्यान, मानवाधिकार कार्यकर्ते, इतिहासकार आणि नोकरशहा यांच्यासह अनेक प्रसिद्ध मंडळींना निवेदन प्रसिद्ध करत दोषींची सुटका रद्द करण्याची मागणी केली. तब्बल सहा हजारजणांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मंजूर केलेल्या माफीला सुप्रीम कोर्टात आव्हान
Bilkis Bano case : दोषींच्या सुटकेवर यूएस आयोगाकडूनही आक्षेप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.