गगनयानच्या अंतराळवीरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका जीममध्ये हे अंतराळवीर व्यायाम करताना दिसत आहेत. व्हिडीओवर भारतीय हवाई दल आणि इस्रोचा लोगोही लावलेला आहे. या व्हिडीओमध्ये इस्रोचे आभारही मानलेले आहेत. यामध्ये चिनूक हेलिकॉप्टरमधून RLV-TD ला आकाशातून खाली सोडतानाही दिसत आहे.
याची व्यवस्थित लँडिंग होते. यानंतर या अंतराळवीरांना दाखवण्यात आलं आहे. हे लोक व्यायाम करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चांद्रयान आणि आदित्य एल १ च्या यशानंतर इस्रोचं गगनयान हे सर्वात मोठं मिशन आहे. यापैकी कोणता तरी एक अंतराळवीर पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्थानकाच्या यात्रेलाही जाऊ शकतो.
२६ ऑक्टोबर रोजी याच्या उड्डाणाची चाचणी होण्याचीही शक्यता आहे. आजतकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. पण इस्रोने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. गगनयानाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. या मिशनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे LVM-3 रॉकेटला गगनयान क्रू मॉड्युल सांभाळण्यासाठी सक्षम बनवणे. तसंच त्याला पूर्णपणे मानवासाठी पूरक बनवणं.
LVM-3ला H-LVM 3 बनवणं आवश्यक आहे, जेणेकरून ते पृथ्वीच्या चारी बाजूला असलेल्या ४०० किलोमीटरच्या गोलाकार कक्षेमध्ये क्रू मॉड्युलला फिरवता येईल. H चा अर्थ आहे ह्यूमन म्हणजे मानव. या रॉकेटचं नाव नंतर HRLV असं होईल. म्हणजे ह्यूमन रेटेड लॉन्च व्हेईकल. या रॉकेटमध्ये सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केलं जाईल. यात क्रू एस्केप सिस्टीम असेल, ज्यामुळे कोणताही धोका निर्माण झाल्यास क्रू मॉड्युल अंतराळवीरांना घेऊन सुरक्षितपणे परत येईल. जर काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर क्रू मॉड्युल अंतराळवीरांना घेऊन समुद्रात कोसळेल.
इस्रोच्या वैज्ञानिकांनी चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांवर काम केलं आहे. जेणेकरून या धोक्यांपासून क्रू मॉड्युल अंतराळवीरांचं संरक्षण करू शकतील. प्रत्येक धोक्यासाठी क्रू मॉड्युल वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत होईल. ते स्वतःच गती नियंत्रित करून अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणेल.
क्रू मॉड्युल म्हणजे काय?
गगनयानामध्ये जिथे अंतराळवीर बसून पृथ्वीच्या चारी बाजूला ४०० किलोमीटर अंतरावरच्या कक्षेमध्ये प्रवास करतील, त्या भागाला क्रू मॉड्युल असं म्हणतात. यामध्ये दोन पदरी भिंत असलेली अत्याधुनिक केबिन असेल. यामध्ये विविध प्रकारच्या नेविगेशन सिस्टीम, आरोग्य सुविधा, जेवणा-खाण्याची सोय, स्वच्छतागृह असतील. क्रू मॉड्युलच्या आतला भाग लाईफ सपोर्ट सिस्टीमने सुसज्ज असेल. उच्चतम आणि नीचतम तापमानातही हे अंतराळवीरांचं संरक्षण करेल. शिवाय अंतराळातल्या किरणोत्सर्गापासूनही ते अंतराळवीरांचा बचाव करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.