Narendra Modi: "आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच सत्तेत येईल; PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील"

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली मोठी भविष्यवाणी
Gujarat Elections 2022
Gujarat Elections 2022esakal
Updated on

लोकसभेच्या निवडणुकीला आता वर्ष उरलं आहे. या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. हे सुरू असतानाच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी मोठी ही भविष्यवाणी केली आहे.

येत्या 2024च्या निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेत येणार असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं शाह यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर भाजपला किती जागा मिळणार याचा आकडाही त्यांनी यावेळी सांगितला आहे.

आसाममधील डिब्रुगड येथे एका सभेत संबोधित करताना अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लवकरच काँग्रेस संपूर्ण देशातून हद्दपार होईल, असं अमित शाह यावेळी म्हणाले आहे.

Gujarat Elections 2022
Dhananjay Munde: मुंडे बहिण-भाऊ एकत्र, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममधील 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवेल. तसेच 300 हून अधिक जागा जिंकून भाजप बहुमत मिळवेल. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील, असं अमित शाह यांनी म्हंटलं आहे.

Gujarat Elections 2022
Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांचा राष्ट्रवादीला खोचक टोला, “राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी…”

पूर्वोत्तरमधील तीन राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्रिपुरात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आले. नागालँड आणि मेघालयात आणि मित्रपक्षांशी मिळवून सत्ता स्थापन केली. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आणि पूर्वोत्तर राज्यात काँग्रेसचं पानीपत झालं. पण तरीही ते बदलणार नाही. राहुल गांधी विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. कोणत्याही देशभक्त नागरिकाने असं करणं योग्य आहे काय? असा प्रश्नही अमित शाह यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.