CJI Chandrachud: न्यायमूर्ती शाहांच्या निरोप समारंभात CJI चंद्रचूड यांचा शायराना अंदाज; म्हणाले 'आंख से दूर...'

बार असोसिएशनच्या एका कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानी कवी ओबेदुल्ला अलीम यांच्या काही ओळी वाचल्या
CJI Chandrachud
CJI ChandrachudEsakal
Updated on

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एमआर शाह काल (सोमवारी 15 मे) न्यायाधीश पदावरून निवृत्त झाले. या निवृत्ती सोहळ्याच्या वेळी देशाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी शाह यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमावेळी सरन्यायाधीशांचा वेगळाच अंदाज दिसून आला.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती एमआर शाह यांना 'टायगर शाह' असं म्हंटलं. त्याचबरोबर, न्यायमूर्ती शाहांचं कौतुक करताना DY चंद्रचूड म्हणाले की, 'व्यावहारिक ज्ञान आणि उत्कृष्ट सल्ले' यांमुळं शहांची कॉलेजियमला निर्णय घेण्यात ​​खूप मदत झाली.

CJI Chandrachud
Ajit Pawar: '१६ आमदार अपात्र ठरणार नाहीत', पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'निर्णय विधानसभा...'

सर्वोच असोसिएशनकडून आयोजित करण्यात आलेल्या न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या निरोप समारंभात बोलताना, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती शाह यांच्या 'संवेदनशील आणि मुक्त स्वभावाचं' देखील कौतुक केलं आहे. तर पुढे बोलताना चंद्रचूड म्हणाले की, शहांनी त्वरीत तंत्रज्ञानाचा अवलंब केला, ज्यामुळे न्यायालयातील सुनावण्या पूर्णपणे पेपरलेस पार पडण्यास सुरुवात झाली.

CJI Chandrachud
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील उदयनराजेंच्या जलमंदिरवर; राजेंना भेट दिली त्यांची आवडती वस्तू

दरम्यान न्यायमूर्ती एमआर शाह यांच्याबाबत बोलताना सरन्यायाधीशांनी पाकिस्तानी कवी ओबेदुल्ला अलीम यांचाही उल्लेख केला आणि म्हणाले, "आंख से दूर सही दिल से कहां जायेगा, जाने वाले तू हमारे याद बहुत आयेगा". तर या कार्यक्रमात न्यायमूर्ती एमआर शहा भावूक झाल्याचं दिसून आलं.

CJI Chandrachud
Nipani Constituency : 'काकासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, पण त्यांनीच शेवटी धोका दिला'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()