'Made in Bihar' Shoes : रशियाच्या सैनिकांना ‘मेड इन बिहार’चे बूट

बिहारमधील हाजीपूर शहर आता पादत्राणे आणि बूट निर्मितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख प्रस्थापित करत आहे. येथील ‘कंपिटन्स एक्स्पोर्ट्स’ नावाची खासगी कंपनी रशियन सैनिकांसाठी दणकट आणि मजबूत बूटची निर्मिती करत असून रशियाचे सैनिक ‘मेड इन बिहार’ चे बूट घालत असल्याचे ‘एएनआय’ने सोशल मीडियावर म्हटले आहे.
'Made in Bihar' Shoes
'Made in Bihar' Shoessakal
Updated on

हाजीपूर/पाटणा : बिहारमधील हाजीपूर शहर आता पादत्राणे आणि बूट निर्मितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख प्रस्थापित करत आहे. येथील ‘कंपिटन्स एक्स्पोर्ट्स’ नावाची खासगी कंपनी रशियन सैनिकांसाठी दणकट आणि मजबूत बूटची निर्मिती करत असून रशियाचे सैनिक ‘मेड इन बिहार’ चे बूट घालत असल्याचे ‘एएनआय’ने सोशल मीडियावर म्हटले आहे. गेल्यावर्षी रशियन सैनिकांसाठी सुमारे बूटाच्या पंधरा लाख जोड निर्यात केल्या असून त्याचे बाजार मूल्य शंभर कोटी रुपये इतके आहे.

बिहारमधील हाजीपूर जिल्ह्याची प्रसिद्धी आता सातासमुद्रापार रशिया आणि युरोपपर्यंत पोचली आहे. रशियाच्या सैनिकांसाठी हाजीपूर जिल्ह्यातील एका खासगी कंपनीने बूटचीची निर्मिती केली. रशियानंतर आता युरोपमध्ये ही कंपनी वेगवेगळ्या आकर्षक शैलीतील बूट निर्यात करत आहे. त्यामुळे हाजीपूरच्या बूटना आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे. युरोपीय देश इटली, फ्रान्स, स्पेन आणि ब्रिटनसाठी आकर्षक डिझाईनचे बूट तयार केले जात असून तेथील बाजारात स्थिरावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बाजारात लवकरच उपलब्ध

कंपनीचे व्यवस्थापक शिबकुमार रॉय म्हणाले, ‘‘हाजीपूरमध्ये २०१८ मध्ये काम सुरू केले. या आधारे स्थानिकांना नोकरी देण्याचा उद्देश होता. आजघडीला कंपनी कडाक्याच्या थंडीत आणि अतिउष्ण तापमानात पायाला सुरक्षा देणाऱ्या बूटची निर्मिती करते आणि या बुटाला रशियाकडून मागणी केली जात आहे. कंपनी वेगळ्या शैलीचे बुट निर्यातीसाठी युरोपात बाजारपेठ तयार करु इच्छित आहे. आम्ही लवकरच स्थानिक बाजारात उतरू.’’

रशियाच्या सैनिकांसाठी बुटाची सर्वाधिक निर्यात करणारा जिल्हा म्हणून हाजीपूरकडे पाहिले जात आहे. पुढच्या वर्षी उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे नियोजन केले जात आहे. हाजीपूरची कंपनी सध्या रशियाला पंधरा लाख जोड निर्यात करत असल्याचे सांगितले.

बूटचे वैशिष्ट्ये

रशियन सैनिकांच्या मागणीनुसार विशेष बूट तयार केले जातात. हे बूट वजनाला हलके असून ते कोणत्याही हवामानाचा सामना करण्यास सक्षम आहेत. शिवाय निसरड्या जागेवरून आणि पाण्यातून वाटचाल करताना पाय घसरणार नाही, या रितीने बूटची रचना केली आहे. यामुळे शून्य ते उणे ४० अंशांपर्यंतचे तापमानाचा कोणताही परिणाम होत नाही. हाजीपूरच्या कंपनीत ३०० हून अधिक जण काम करतात आणि त्यात ७० टक्के महिला आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.