'देव तारी त्याला कोण मारी' असं म्हणतात. देवाचा वरदहस्त असेल तर कितीही मोठं संकट आलं, तरी त्यातून सुखरुप सुटका होते. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ (Viral Video) पाहिला की याची प्रचिती येते. हा व्हिडीओ पाहून तुमचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. भरधाव वेगाने धावणाऱ्या रेल्वेने धडक (Railway accident) देऊनही एक वासरू (Cow Calf) आश्चर्यकारकरित्या बचावलं (safe) आहे.
रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) नेहमीच अपघात घडत असतात. हे अपघात इतके भयानक असतात की त्यातून वाचणं जवळपास अशक्यच असते. अनेक लोकांना रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे अनेक मुक्या जनावरांनाही प्राणाला मुकावं लागलं आहे. मात्र एका वासराला रेल्वेने जोराची धडक देऊनही ती वाचली आहे. .या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये (Video) आपल्याला पाण्याचा एक छोटा कॅनॉल दिसत आहे. कॅनॉलमध्ये थोडं पाणी असल्याचंही दिसतंय. कॅनॉलवर रेल्वेचा एक पूल (Railway bridge over Canol) आहे. एक पांढऱ्या रंगाचं गाईचं वासरू अचानक त्या पुलावरील रेल्वे ट्रॅकवर येतं आणि बरोबर पुलाच्या मध्यावर येऊन थांबते. दरम्यान अचानक रेल्वेच्या शिट्टीचा (Railway Horn) आवाज येऊ लागतो. वासराला याचा अंदाज नसल्यामुळे ते तिथेच उभे राहतं. रेल्वेचा मोटरमन हॉर्न वाजवत असतो. परंतु वासराला काहीच कळत नाही. शिवाय पुल खुपच अरुंद असल्यामुळे त्या वासराला इतरत्र जायलाही जागा उतर नाही. शेवटी काही सेकंदाच्या आतच रेल्वे पुलावर येते आणि जे घडायला नको तेच घडते.
भरधाव वेगात असलेली मालगाडी त्या गोंडस वासराला जोराची धडक देते (The train hits the cow calf) . या जोराच्या धडकेनं वासरु उडून कॅनॉलमध्ये पडतं. ते वासरू आता वाचू शकत नाही, म्हणून आपणही डोळे मिटून घेतो. परंतु पुढच्या सेकंदाला जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा वासरू सुखरूप असल्याचं आपल्याला दिसतं. रेल्वेची त्याला धडक बसल्यावर ते वासरु अगदी नशिबाने बाजूच्या कॅनॉलमध्ये पडतं. दैव बलवत्तर म्हणून ते वाचतं. जर ते रेल्वेखाली सापडलं असते. तर काय झालं असतं, या नुसत्या कल्पनेनंच आपल्या अंगावर शहारे येतात.
khannoor30621 नावाच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर (share) करण्यात आला आहे. अगदी 5-10 सेंकंदात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. जो खूप व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडल्याचं दिसत आहे. या अपघातातून वासराचा जीव वाचल्याबद्दल लोकांनी वासराला नशिबवान (lucky calf) असल्याच्या प्रतिक्रिया (comment) नोंदवल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.