UPSC : इमारत सील, परीक्षा कशी देणार?, दिल्ली HC त मुंबईच्या उमेदवाराचा उल्लेख

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्यमुळे अनेक इमारती सील करण्यात आल्या आहेत.
UPSC
UPSCesakal
Updated on

नवी दिल्ली - कोविड-19 ची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनचा (Omicron) प्रसार पाहता 7 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत होणारी UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा, 2021 पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, मुंबईतील एका उमेदवाराचा दाखला देत त्याची इमारत कोविडमुळे सील (Sealed And Containment Zones) करण्यात आली आहे. त्याला कोविड आहे किंवा नाही याची पर्वा न करता, किंवा त्याच्या कोणताही दोष नसताना तो परीक्षेला जाऊ शकणार नसल्याचा उल्लेख याचिकार्त्यांच्या वकीलांकडून करण्यात आला. (Delhi High Court Dismissed Plea Of seeking postponement UPSC Mains Examination)

UPSC
UPSC : ओमिक्रॉनचं संकट, परीक्षा वेळापत्रकानुसारच! हायकोर्टाने याचिका फेटाळली

कोर्टाच्या या निर्णयणामुळे नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021 पूर्व-निर्धारित वेळापत्रकानुसार होणार आहे. (UPSE Exam 2022) UPSC ने 7 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत प्रत्येकी तीन तासांच्या दोन शिफ्टमध्ये या परिक्षा आयोजित करण्याची घोषणा केली होती. ओमिक्रॉन संसर्गाच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका UPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2021 मध्ये यशस्वी झालेल्या काही उमेदवारांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. त्यावर आज दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्णय दिला आहे. याचिकाकर्त्यांच्या दाखल केलेल्या याचिकेत देशात कोविड-19 चे रूग्ण वाढत असताना परीक्षा घेण्याची ही योग्य वेळ नसल्याचा उल्लेख करत परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.