भारताचं 'आधार' होणार आंतरराष्ट्रीय! वर्ल्ड बॅंकेनेही केलं कौतुक

भारताचं 'आधार' होणार आता आंतरराष्ट्रीय! वर्ल्ड बॅंकेनेही केलं कौतुक
Aadhar Card
Aadhar CardAadhar Card
Updated on
Summary

आता अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची ओळख तयार करण्याचे काम सुरू आहे, जे 'आधार'च्या मॉडेलवर आधारित असेल.

भारताची आधार (Aadhaar Card) प्रणाली आता आंतरराष्ट्रीय (International) होणार आहे. आता अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची ओळख तयार करण्याचे काम सुरू आहे, जे 'आधार'च्या मॉडेलवर आधारित असेल. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India - UIDAI) यासाठी जागतिक बॅंक (World Bank) आणि संयुक्त राष्ट्रांसोबत (United Nations) मिळून काम करण्याचा विचार करत आहे.

Aadhar Card
Omicron च्या पार्श्वभूमीवर देखील साखर उद्योग निर्यातीसाठी आशावादी!

अनेक देशांनी स्वीकारलं आधीच 'आधार'चं मॉडेल

यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गर्ग (Saurabh Garg) यांनी पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाने (Ment Council of India) आयोजित केलेल्या डिजिटल मनी कॉन्फरन्समध्ये ही माहिती दिली. ते म्हणाले, की युनिव्हर्सल ग्लोबल आयडेंटिटी सिस्टीमवर सक्रियपणे काम केले जात आहे. शेजारील देशांसह अनेक देशांनी यामध्ये स्वारस्य दाखवल्याचे त्यांनी सांगितले. काही देशांनीही हे मॉडेल स्वीकारले आहे आणि अनेक जण ते स्वीकारत आहेत.

UIDAI चा दावा : 'आधार' पूर्णपणे सुरक्षित आहे

गर्ग यांनी दावा केला, की आधार आता भारतातील 99.5 टक्के लोकसंख्येला कव्हर करत आहे. आर्थिक सेवा सार्वत्रिक बनवली आहे. ही एक अशी प्रणाली आहे ज्याच्या डिझाइनमध्ये अंगभूत गोपनीयता आहे. आधारचे डेटा सेंटर वेगळ्या पद्धतीने माहिती साठवतात. ही सर्व वैशिष्ट्ये आधार सुरक्षित करतात.

Aadhar Card
नॅशनल हाउसिंग बॅंकेत निघाली डेप्युटी व रिजनल मॅनेजर पदांची भरती!

आधारवर निर्माण होतो वाद

मात्र, आधार डेटामधील कथित उल्लंघनावरून वेळोवेळी वाद निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका हॅकरने आधारचे उल्लंघन केल्याचा दावा केला होता. त्यानंतर प्राधिकरणाने कोणतेही उल्लंघन नाकारून आधार पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.