Indian Army : भारतीय लष्कर हिवाळ्यात थेट तवांगमध्ये उतरणार

उंचावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा राष्ट्राला समर्पित
Indian Army
Indian Armyesakal
Updated on

इटानगर- नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात तेरा हजार फूट उंचावर उभारण्यात आलेला सेला बोगदा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आला. रणनितीकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तवांगला भारताशी जोडण्याचे काम या बोगद्यामुळे होणार असून यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये भारतीय लष्कराला वेगवान हालचाली करणे शक्य होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बोगद्यामुळे चिनी लष्कराच्या हालचालींवर जवळून लक्ष ठेवणे भारताला शक्य होणार आहे. या बोगद्याच्या निर्मितीवर ८२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून आसामचे तेजपूर आणि अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग हे दोन जिल्हे या बोगद्याच्या माध्यमातून जोडल्या जातील.

Indian Army
Beauty Tips : पार्लर ट्रिटमेंटपेक्षाही अधिक ग्लो देतील बदामाचे फेसपॅक, असे बनवा घरच्या घरी

हा जगातील सर्वाधिक उंचीवर उभारण्यात आलेला बायलेन रोड टनल आहे. या बोगद्यामुळे भारतीय लष्करास भर हिवाळ्यात चीनला लागून असलेल्या थेट ताबा रेषेवर जाणे शक्य होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. इटानगर येथील ‘विकसित भारत, विकसित ईशान्य’ या कार्यक्रमातून मोदींनी ऑनलाइन पद्धतीने या बोगद्याचे उद्‍घाटन केले. हिमवृष्टी आणि भूस्खलनामुळे बालीपूर- चारीदुआर आणि तवांग रोडवर सातत्याने अडथळे निर्माण होत असतात. यावर तोडगा काढण्यासाठी हा बोगदा उभारण्यात आला आहे. या बोगद्याच्या उभारणीसाठी सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) पुढाकार घेतला होता.

Indian Army
Yoga Tips : ‘या’ योगासनांचा सराव प्रत्येक गृहिणीने करायलाच हवा, तंदूरूस्तीसाठी आहे फायदेशीर

आधुनिक यंत्रणांचा समावेश

सेला टनलमध्ये जेट फॅन व्हेंटिलेशन, अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षिततेसाठी अन्य आधुनिक यंत्रणांची सोय करण्यात आली आहे. हिवाळ्यामध्ये या भागातील प्रमुख रस्ते हिमवृष्टीमुळे बंद होतात अशा स्थितीमध्ये चीन सीमेवर लष्करी तुकड्या, शस्त्रे, आणि अन्य यंत्रणांची ने-आण करण्यासाठी हा बोगदा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बोगद्यामध्ये पर्यायी वाहतुकीसाठी आणि आपत्कालीन व्यवस्था म्हणून बायलेन ट्यूबची सोय करण्यात आली आहे.

Indian Army
Kitchen Tips : किचनमधील या वस्तू कधीच फेकून देऊ नका, कारण...

पंतप्रधान मोदींची मेगा भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईशान्येसाठीच्या ५५ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‍घाटन केले. मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशातील प्रकल्पांचा यात समावेश आहे. सेला टनलप्रमाणेच अरुणाचल प्रदेशला ४१ हजार कोटी रुपयांच्या अन्य विकास प्रकल्पांची भेट मिळाली आहे.

प्रकल्पाचे स्वरूप

२- बोगदे

१- लिंक रोड

पहिला बोगदा

९८० मीटर लांब

सिंगल ट्यूब

दुसरा बोगदा

१ हजार ५५५ मीटर लांब

ट्विन ट्यूब टनल

१ हजार २०० मीटर

लिंक रोडची व्याप्ती

९० लाख मानवी तास

प्रकल्पासाठीचा वेळ

६५० कामगार

अहोरात्र काम करत होते

७१ हजार मेट्रिक टन

सिमेंटचा वापर

५ हजार मेट्रिक टन

स्टीलचा वापर

८०० मेट्रिक टन

खडक फोडण्यासाठी

वापरलेली स्फोटके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.