Jammu and Kashmir : घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला;कुपवाडामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज चकमक झाली. नियंत्रण रेषा ओलांडत घुसखोरी करण्याचा दोन दहशतवाद्यांचा कट उधळून लावत जवानांनी त्यांना ठार केले. कुपवाडा जिल्ह्यातील उत्तरेकडीन केरन सेक्टरमध्ये ही घटना घडली.
Jammu and Kashmir
Jammu and Kashmirsakal
Updated on

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज चकमक झाली. नियंत्रण रेषा ओलांडत घुसखोरी करण्याचा दोन दहशतवाद्यांचा कट उधळून लावत जवानांनी त्यांना ठार केले. कुपवाडा जिल्ह्यातील उत्तरेकडीन केरन सेक्टरमध्ये ही घटना घडली.

दहशतवाद्यांचा एक गट घुसखोरी करत असल्याचे जवानांना दिसल्यावर त्यांनी माघारी फिरण्याचा इशारा दिला. मात्र, दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी मारले गेले. या भागात रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. १४ जुलैलाही याच भागातून दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

दोडा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच झालेल्या चकमकीत लष्कराचे चार जवान हुतात्मा झाले आहेत. यानंतर येथे शोधमोहिम सुरू आहे. या हल्ल्यांमागे ‘काश्‍मीर टायगर्स’ या गटाचा हात असून पाकमधील जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे या गटाला पाठबळ आहे.

दोडा जिल्ह्यात चकमक

दोडा जिल्ह्यातही बुधवारी मध्यरात्री दहशतवाद्यांबरोबर चकमक होऊन लष्कराचे दोन जवान जखमी झाले. जद्दन बाता गावात सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान येथील एका शाळेत रात्रीच्या विश्रांतीसाठी जवानांचे पथक थांबले असताना दहशतवाद्यांनी मध्यरात्री शाळेवर बेछूट गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी पळून गेले. जखमी जवानांना उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.