'मॅडम, माझा बालविवाह होतोय!' फोन करून मुलाने थांबवले स्वत:चे लग्न

'मॅडम, माझा बालविवाह होत आहे!' फोन करून मुलाने थांबवले स्वत:चे लग्न
'मॅडम, माझा बालविवाह होतोय!' फोन करून मुलाने थांबवले स्वत:चे लग्न
'मॅडम, माझा बालविवाह होतोय!' फोन करून मुलाने थांबवले स्वत:चे लग्नesakal
Updated on
Summary

तरुण मुलींचे लग्न होत असेल तर तिचे लग्न रोखण्याचा प्रयत्न केल्याचे अनेकदा दिसून येते. मात्र, एका 19 वर्षीय मुलाने फोन करून स्वत:चे लग्न थांबवले.

अल्पवयीन मुलींचे लग्न (Child Marriage) होत असेल तर तिचे लग्न रोखण्याचा प्रयत्न केल्याचे अनेकदा दिसून येते. मात्र, राजस्थानमध्ये (Rajasthan) एका 19 वर्षीय मुलाने फोन करून त्याचे स्वत:चे लग्न थांबवले. हे प्रकरण दौसाच्या सिकराई येथील आहे. आज (सोमवारी) त्याचं लग्न होणार होतं. पण त्याने राज्य बाल आयोगाला (State Child Commission) फोन करून याबाबत कळवले आणि लग्न थांबवले.

'मॅडम, माझा बालविवाह होतोय!' फोन करून मुलाने थांबवले स्वत:चे लग्न
'ओमीक्रोन'मुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय बदलणार?

वयाच्या दाखल्यासाठी हायस्कूलची मार्कशीटही पाठवली

तक्रारदार मुलगा बारावीचा विद्यार्थी आहे. त्याने पुढे शिक्षण घ्यायचे असल्याचे सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच बाल आयोगाने जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या अल्पवयीन विद्यार्थ्याचे लग्न कायदेशीररीत्या ठरवून दिलेल्या वयाच्या 21 व्या वर्षीच व्हावे, याकडे प्रशासनाला लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. राजस्थान बाल हक्क अध्यक्षा संगीता बेनिवाल यांनी सांगितले की, एखाद्या मुलाने फोन करून स्वत:चे लग्न मोडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. बेनिवाल यांच्या म्हणण्यानुसार, मुलाने फोन करून सोमवारी लग्न असल्याचे सांगितले होते. लग्नपत्रिकेच्या फोटोसोबत त्याने वयाचा पुरावा म्हणून दहावीच्या गुणपत्रिकेचा फोटोही पाठवला होता. यानंतर बेनिवाल यांनी अधिकाऱ्यांना बोलावून लग्न थांबवण्याच्या सूचना दिल्या.

'मॅडम, माझा बालविवाह होतोय!' फोन करून मुलाने थांबवले स्वत:चे लग्न
वडिलांच्या राज्यमंत्रिपदाचा डामडौल न करता निर्माण केली स्वत:ची ओळख!

कमी होत आहेत बालविवाहाची प्रकरणे

बेनिवाल म्हणाल्या की, मुलेही अल्पवयीन विवाहाविरोधात आवाज उठवत आहेत ही चांगली गोष्ट आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, नुकतीच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाची पाचवी आवृत्ती बाहेर आली आहे. त्यात असे नोंदवले गेले आहे की 28.2 टक्के मुलांनी कायदेशीर वय गाठण्यापूर्वीच लग्न केले होते. त्याच वेळी, 25.4 टक्के मुलींचे कायदेशीर वय पूर्ण होण्यापूर्वीच लग्न झाले होते. मात्र, राजस्थानमध्ये बालविवाहाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. ग्रामीण भागाबद्दल बोलायचे झाल्यास, 2015-16 मध्ये येथे 44.7 टक्के बालविवाह नोंदवले गेले तर 2019-20 मध्ये ते 33.2 टक्‍क्‍यांवर आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.