PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता 'या' दिवशी येणार! असे तपासा यादीत नाव

14 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojanaesakal
Updated on

PM Kisan Yojana Update News: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळू शकेल, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता मे अखेरीस येणे अपेक्षित आहे.

काही अहवालांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा पुढील हप्ता 26 मे ते 31 मे या कालावधीत कधीही जारी केला जाऊ शकतो. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, 13 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये पाठवण्यात आला होता.

पीएम किसान योजनेचा हप्ता किती वेळा जारी केला जातो?

पीएम किसान योजनेंतर्गत, वार्षिक 6000 रुपये दिले जातात, त्यापैकी तीन हप्त्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले जातात. हे हप्ते एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केले जातात.

या योजनेंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, परंतु डिसेंबर 2018 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

PM Kisan Yojana
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा बँकांना दिलासा! फ्रॉड घोषित करण्यापूर्वी कर्जदारांचे म्हणणं...

यादीत तुमचे नाव कसे तपासायचे:

तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत अर्ज केला असेल किंवा पुढील हप्त्यासाठी तुमचे नाव यादीत पाहायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर लाभार्थी यादीत जा, राज्य, नाव आणि इतर गोष्टींची माहिती भरा. त्यानंतर गेट रिपोर्टवर जा. तुमचा संपूर्ण तपशील तिथे दिसेल.

तुम्ही या वेबसाइटला भेट देऊनही अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला सेल्फ-रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण माहिती भरावी लागेल. पुढे गेल्यास तुमची नोंदणी पूर्ण होईल.

PM Kisan Yojana
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.