Assam Agitation : आसाममध्ये आंदोलनाचा भडका

अनेक ठिकाणी कायद्याच्या प्रती जाळल्या
Assam Agitation
Assam AgitationEsakal
Updated on

गुवाहाटी : देशभर केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायद्याची (सीएए) अंमलबजावणी केल्यानंतर आसाममध्ये आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. या कायद्याचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमांचे दहन केले. आसाम जातीय युवा छात्र परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज तीव्र आंदोलन केले. आसाम काँग्रेसचे नेते देवव्रत सैकिया यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले होते.

Assam Agitation
Baby Care Tips : लहान मुलांसाठी स्किनकेअर उत्पादने खरेदी करण्यापूर्वी, पालकांनो लक्षात ठेवा 'या महत्वाच्या गोष्टी

पक्षाचे मुख्यालय असलेल्या राजीव भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कायद्याच्या प्रतींचे दहन केले. कामरूप जिल्ह्यातील रंगिया टाऊन खेड्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या कायद्याच्या प्रती जाळण्यात आल्या. विविध महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्याबाहेरही आंदोलन करण्यात आले. रायजोर दल, कृषक मुक्ती संग्राम समिती आणि छात्र मुक्ती परिषद या संघटनाही शिवसागर जिल्ह्यामध्ये रस्त्यांवर उतरल्या होत्या.

Assam Agitation
Yoga Tips : ‘या’ योगासनांचा सराव प्रत्येक गृहिणीने करायलाच हवा, तंदूरूस्तीसाठी आहे फायदेशीर

पोलिसांकडून नोटिसा

शिवसागर, गोलाघाट, नगाव आणि कामरूप या जिल्ह्यांमध्ये अनेक दुकाने आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आसाम पोलिसांनी विरोधी नेत्यांना नोटिसा बजावल्या असून हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन विविध संघटनांना करण्यात आले. ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’ आणि ३० अन्य अराजकीय संघटना या राज्यात सत्याग्रह करणार असून कायदेशीर आघाडीवर संघर्षासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

Assam Agitation
Hair Care Tips : कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी लिंबाच्या सालींचा अशा प्रकारे वापर करा, जाणून घ्या

वेगळ्या पोर्टलची सोय

नागरिकत्व सुधारणा कायद्याची देशभर अंमलबजावणी केल्यानंतर आता पात्र नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी नोंदणी करता यावी म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने वेगळे पोर्टल सुरू केले आहे. या नागरिकांना indiancitizenshiponline.nic.in या पोर्टलवर नोंदणी करता येईल. केंद्राकडून लवकरच ‘सीएए-२०१९’ हे वेगळे मोबाईल ॲप देखील सुरू करण्यात येणार आहे.

न्यायालयात याचिका

केंद्र सरकारने देशभर ‘सीएए’ लागू केल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. मुस्लिम लीगने यासंदर्भात याचिका दाखल करत या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ‘सीएए’ कायद्यानुसार काही धर्माच्या लोकांनाच नागरिकत्व दिले जाणार आहे. हे राज्यघटनेच्या विरोधात असल्याने हा कायदा राबविण्यास मनाई करावी, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.