Luni River: ही नदी समुद्राला मिळतच नाही मग जाते तरी कुठे? जाणून घ्या रहस्यमय फॅक्टस्

भारतात एक अशी नदी आहे जिचा उगम तर होतो पण ती कोणत्याही समुद्राला जाऊन मिळत नाही.
Luni River ending point
Luni River ending pointesakal
Updated on

Luni River ending point: आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, नदी डोंगरातून उगम पावते, खडकांमधून गावागावातून वाहत जाते मग एका महानदीला मिळते आणि तिथून ती पुढे समुद्राला जाऊन मिळते. निसर्गाच हे चक्रच आहे. पण भारतात एक अशी नदी आहे जिचा उगम तर होतो पण ती कोणत्याही समुद्राला जाऊन मिळत नाही.

नक्की कोणती नदी आहे ही?

या नदीचं नाव लुनी नदी असं आहे. लवणाद्रि किंवा संस्कृत शब्द लवणगिरी यापासून लुनी हे नाव आले आहे. लुनी म्हणजे खाऱ्या पाण्याची नदी. या नदीच्या पाण्यात असणाऱ्या अत्याधिक प्रमाणातील क्षारांमुळे नदीला हे नाव पडले.

लुनी नदीचा उगम अजमेर प्रदेशातील अरावलीच्या नागा पर्वतरांगांमध्ये होतो. समुद्रसपाटीपासून ७७२ मीटरच्या उंचीवर नागा पर्वतावर लुनी नदी उगम पावते.

कवी कुलगुरू कालिदासांच्या साहित्यात उल्लेख:

प्राचीन काळात कवी कुलगुरू कालीदासांच्या साहित्यात देखील या नदीचा उल्लेख वाचायला मिळतो. त्यांनी या नदीला ‘अंत:सलिला’ असे म्हटले आहे.

या नदीचे प्राचीन नाव लवणवती असे होते. अजमेर क्षेत्रात या नदीला ‘सागरमती’ असेही म्हणतात.

अजमेर जिल्ह्यात उगम पावून ही नदी पुढे दक्षिण-पश्चिम दिशेला गुजरात राज्याकडे वळते. नागौर, जोधपूर, पाली, बाडमेर आणि जालोर या जिल्ह्यांतून प्रवास करीत लुनी नदी अखेर कच्छच्या रणात येऊन थांबते.

कच्छच्या वाळवंटात अखेर ही नदी लुप्त होते आणि पुढे कुठल्याही नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळत नाही.

Luni River ending point
White Hair: कमी वयात केस पांढरे का होतात ? यावर उपाय काय ?

असं का घडतं?

राजस्थान जिल्ह्यात मुळातच पावसाचे प्रमाण कमी आहे. उन्हाळा तीव्र स्वरूपाचा आणि त्यामुळे तापमान सुद्धा जास्त! त्यामुळे लुनी नदीला मुळातच पाणी कमी आहे. राजस्थानमधील भूप्रदेशात वाळूचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे पाणी जमिनीत झिरपत नाही.

तापमान जास्त असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे लुनी नदीत क्षारांचे प्रमाण जास्त आहे.

Luni River ending point
Amit Shah Love Story : कोल्हापूरच्या पोरीच्या प्रेमात पडले होते अमित शाह; लग्नासाठी विचारलं तर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.