नवी दिल्ली : देशातील कोरोना विषयक स्थितीची माहिती पत्रकारांना देताना नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) पॉल बोलत होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव डॉ. लव अगरवाल यावेळी उपस्थित होते. देशातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना आटोक्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु ही स्थिती आपल्याला कायम ठेवायची आहे. त्यासाठी सध्यातरी आपल्याला नियमांचे कसोशीने पालन करावेच लागेल. लस ही घ्यावीच लागेल. त्यामुळे संसर्गाचे गंभीर परिणाम होणार नाही, असे पॉल म्हणाले.
कोरोनाची तीव्रता कमी झाला आहे, असा आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर देशातील शाळा उघडण्याचा विचार केला जाऊ शकतो. तोपर्यंत विद्यार्थी, शिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या जीवन धोक्यात घालता येणार नाही. परदेशात शाळा उघडल्या होत्या. परंतु त्यांना पुन्हा बंद कराव्या लागल्या आहेत, असे सांगताना अजूनही शाळा उघडण्यास परवानगी देण्याचा विचार नसल्याचे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले.
लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मुलांना अधिक संसर्ग झाला. मात्र त्याची तीव्रता कमी होती. तरीही मुलांच्या संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता, त्यांना कशी आणि कोणते उपचार करायचे, याची पद्धती निश्चित करण्यात येत आहे. त्यांना उपचार आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. अगरवाल म्हणाले, ‘‘तिसऱ्या लाटेत विद्यार्थ्यांना धोका नसेल, असे सांगितले जाते. परंतु विषाणूचे स्वरूप बदलू शकते, हे गृहीत धरूनच त्याला तोंड देण्याची तयारी आम्ही केली आहे.’’
मुलांमध्ये संसर्गाची तीव्रता कमी असली, तरी उद्या ती कशी असेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे शिक्षकांचे लसीकरण आणि कोरोना आटोक्यात विश्वास आल्यानंतरच शाळा सुरू करण्यासंबंधी विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याचा दावा करताना लव अगरवाल म्हणाले, ‘‘देशात सात मे रोजी कोरोना रुग्णांची संख्या चार लाख १४ हजारांहून अधिक होते. आता संसर्गाच्या दरात ८५ टक्के घट झाली असून, नव्या दैनंदिन रुग्णांची संख्या ६२ हजारांवर आली आहे. यापूर्वी ५३१ जिल्ह्यांमध्ये दररोज शंभरहून अधिक व्यक्ती बाधित होत होत्या. आता शंभरपेक्षा अधिक रुग्ण नोंद होणाऱ्या जिल्ह्यांची संख्या १४७ झाली आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.