Patna : पोलिसाच्या मारहाणीत शस्त्रक्रियेचे टाके तुटले;रेल्वे प्रवासी जखमी झाल्याने दोघे निलंबित

जागेवरून पेटलेला वाद एका प्रवाशांला गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरला. जीआरपीच्या (रेल्वे पोलिस) लाठीमारात एका प्रवाशाचे शस्त्रक्रियेचे टाके तुटले आणि आतडे बाहेर आले.
Patna
Patna sakal
Updated on

पाटणा : जागेवरून पेटलेला वाद एका प्रवाशांला गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरला. जीआरपीच्या (रेल्वे पोलिस) लाठीमारात एका प्रवाशाचे शस्त्रक्रियेचे टाके तुटले आणि आतडे बाहेर आले. ही घटना गुरुवारी जनकपूर रेल्वे स्थानकात घडली असून याप्रकरणी दोन जवानांना निलंबित केले आहे.

मुझफ्फरपूरच्या ‘जीआरपी’ने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, गुरुवारी सायंकाळी जनकपूर रोड स्थानकावर मुंबईला जाणारी कर्मभूमि एक्स्प्रेस उभी होती. या रेल्वेत बसण्यावरून दोन गटात बाचाबाची सुरू झाली. मात्र वाद एवढा वाढला की जीआरपीच्या जवानांना हस्तक्षेप करावा लागला.

तरीही प्रवासी शांत झाले नाही. उलट या वादाने एवढे उग्र रुप धारण केले की त्यांनी जवानांवरच हल्ला केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल जवानांनी प्रवाशांना हुसकावून लावण्यासाठी लाठीमार केला.मात्र यात एक प्रवासी गंभीर जखमी झाला. त्याचे नाव मोहंमद फुरकान असून त्याचे काही दिवसांपूर्वीच पोटाची शस्त्रक्रिया झाली होती.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसारल जवानाने फुरकान यांच्या पोटावर काठ्या घातल्या. त्यामुळे शस्त्रेक्रियेचे टाके तुटले आणि आतडे बाहेर आले. या प्रकरणी तातडीने कारवाई करत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून चौकशी सुरू केली आहे. फुरकान यांच्यावर मुझफ्फरपूरच्या श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.