West Bengal Police: ममता विरुद्ध मोदी वाद टोकाला, प. बंगालमध्ये थेट NIA अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

NIA Officers: "एनआयएने मध्यरात्री छापेमारी का केली? त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली होती का? अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आल्यावर त्यांनी जे करायला हवे होते ते स्थानिक लोकांनी केले."
West Bengal Police|NIA Officers
West Bengal Police|NIA OfficersEsakal
Updated on

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमुल काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात पूर्व मिदनापुरमध्ये एनआयए च्या पथकावर झालेल्या हल्ल्यावरुन जोरदार वाकयुद्ध सुरू आहे.

अशात एनआयए कडून अटक करण्यात आलेले टीएमसी नेते मोनोब्रता जाना यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन एनआयए पथकातील अधिकारी आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या विरोधात पश्चिम बंगाल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मोनोब्रता जाना यांच्या पत्नीने आरोप केला आहे की, एनआयए अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरात घुसत त्यांना मारहाण केली. त्यांनी असाही आरोप लावला की, अधिकाऱ्यांनी त्यांचा अपमान केला. यानंतर एनआयए अधिकाऱ्यांविरोधात भूपतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

'एनआयए'चे पथक मोनोब्रता जाना यांच्या घरी 2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी गेले होते. यावेळी एनआयएचे पथक दोन आरोपींना अटक करून कोलकाता येथे आणत होते, त्यादरम्यान एनआयए पथकावर हल्ला करण्यात आला.

ग्रामस्थांनी एनआयए पथकाच्या ताफ्याला घेरा घातला आणि दगडफेक केली. या हल्ल्यात अधिकारी जखमी झाले.

विशेष म्हणजे एनआयएने आपल्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून जवळपास २४ तास उलटले असले तरी स्थानिक पोलीस एकाही व्यक्तीला अटक करू शकलेले नाहीत.

West Bengal Police|NIA Officers
Hemant Soren: हेमंत सोरेन यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात फ्रिज, स्मार्ट टीव्हीच्या पावत्यांची एन्ट्री; ईडीची मोठी खेळी

पोलिसांनी सांगितले की, एएनआयकडून अटक करण्यात आलेले आरोपी आणि टीएमसी नेते मोनोब्रता जाना यांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली होती. त्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

रात्री उशिरा घराचे दरवाजे तोडून अधिकाऱ्यांनी महिलांसोबत अश्लील कृत्य केल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. यापूर्वी एनआयएने 6 एप्रिल रोजी भूपतीनगर पोलीस ठाण्यातही हल्ल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

West Bengal Police|NIA Officers
Lok sabha election 2024 : ''सत्तेत आल्यानंतर संपत्तीचं सर्व्हेक्षण करणार'', राहुल गांधींची मोठी घोषणा

याप्रकरणी भाजपने तृणमुल सरकारवर जोरदार टीका करत आहे. ममता बॅनर्जींच्या राजवटीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून हे सर्व पोलिसांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "एनआयएने मध्यरात्री छापेमारी का केली? त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली होती का? अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आल्यावर त्यांनी जे करायला हवे होते ते स्थानिक लोकांनी केले."

या घटनेवर भाजप नेते राहुल सिन्हा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत त्या हल्लेखोरांच्या समर्थनार्थ उभ्या असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिथे मुख्यमंत्री हल्लेखोरांना पाठीशी घालतात तिथे हल्ले होणे स्वाभाविक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.