सोशल मीडियावरील निर्बंधांवर संसदेत विधेयक, राज्यसभेत भाजपकडून व्हीप जारी

महिलांच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही - माहिती तंत्रज्ञान मंत्री
Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnawटिम ई सकाळ
Updated on

मुस्लीम महिलांना घेऊन बुली बाई (Bulli bai) प्रकरण देशभर खुप गाजले. यावरून महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. महिलांच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सांगत संसदेत राजकीय सहमती असल्यास सोशल मीडियाला अधिक जबाबदार बनवण्यासाठी कठोर नियम आणण्यास तयार असल्याचे सरकारने (Government) शुक्रवारी सांगितले.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) राज्यसभेत प्रश्नांना उत्तर देतांना म्हणाले, “सोशल मीडियावर मुस्लिम महिलांचे फोटोग्राफ्स (Photoghraphs) आणि इतर तपशील लिलावासाठी आणल्‍यानंतर नाराजी निर्माण करण्यात आली होती मात्र सरकारने तत्काळ कारवाई केली होती.”

Ashwini Vaishnaw
शिवशाहीचा अपघात : एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी

संसदेत राजकीय सहमती असल्यास सोशल मीडियाला (social Media) अधिक जबाबदार बनवण्यासाठी कठोर नियम आणण्यास तयार असल्याचे शुक्रवारी मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले त्यामुळे आज राज्यसभेत यावर विधेयक जारी होण्याची शक्यता आहे तर भाजपने आपल्या राज्यसभा खासदारांना ८ फेब्रुवारी रोजी सभागृहात उपस्थित राहून सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.