जम्मू-काश्मीर: स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीला तीन वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही

जम्मू-काश्मीर: स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीला तीन वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Updated on

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये यंदाचा स्वातंत्र्यदिन वेगळा ठरला आहे. कारण या ठिकाणी गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनादिवशी इंटरनेट आणि मोबाईल सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

जम्मू-काश्मीर: स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीला तीन वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
#यह_आज़ादी_झूठी_है स्वातंत्र्याच्या दिवशी का होतय ट्रेंड?

गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच अशी काहीशी घटना घडत आहे. स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच अविरतपणे इंटरनेट सेवा सुरु आहे. काश्मीरमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवेवर परिणाम न झाल्याची गेल्या तीन वर्षांतील पहिलीच वेळ आहे. याआधी सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी या सेवा बंद करण्यात येत होत्या. यापूर्वी २०१८ मध्ये राज्यपाल एन एन वोहरा यांच्या कार्यकाळात या सेवा बंद करण्यात आल्या नव्हत्या.

जम्मू-काश्मीर: स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीला तीन वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
स्वातंत्र्य दिनाचं गिफ्ट, 100 लाख कोटींच्या योजनेची घोषणा

श्रीनगर पोलिसांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकांना शुभेच्छा देणारे होर्डिंग लावले आहे. हे होर्डिंग शांतता आणि समृद्धीचा संदेश देतात. शहरातील प्रमुख रस्त्यांवर असे आणखी होर्डिंग लावले गेले आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीर: स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीला तीन वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Independence Day: PM मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.