Amit Shaha : भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही

सरकारच्या कार्यकाळाबाबत बोलताना शहा म्हणाले की, सुधारणा आणि आर्थिक विकास करीत असताना सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही.
Amit Shaha
Amit Shahasakal
Updated on

नवी दिल्ली - ‘केंद्रातील मोदी सरकारवर मागील दहा वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. ‘धोरणात्मक लकवा संपवून देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम या सरकारने केले आहे,’ असेही शहा यांनी नमूद केले.

२०१४ पूर्वी भारताची गणना दुबळ्या अर्थव्यवस्थांमध्ये केली जात असे. मात्र मागील दहा वर्षांत मोदी सरकारने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्थेच्याबाबतीत देशाची ओळख ‘आशेचा किरण’ अशी झाली आहे. सरकारने हाती घेतलेल्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे २०४७ पर्यंत देश विकसित होण्यास मदत होणार आहे.

पायाभूत सुविधांचा विकास, दळणवळण व्यवस्था सुधारणे, रेल्वेचे जाळे विस्तारणे, सेमीकंडक्टर उद्योग, डिजिटल अर्थव्यवस्था तसेच इलेक्ट्रिक वाहनांना चालना देणे यावर सरकारने भर दिला आहे,’ असे शहा यांनी सांगितले.

सरकारच्या कार्यकाळाबाबत बोलताना शहा म्हणाले की, सुधारणा आणि आर्थिक विकास करीत असताना सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. या कालावधीत नक्षलवाद, दहशतवाद आणि ईशान्य भारतातील हिंसाचार लक्षणीयरित्या कमी झाला आहे. शहा यांनी यावेळी सरकारच्या आर्थिक धोरणाबाबतही भाष्य केले. ‘दशकभरापूर्वी महागाईचा दर दहा टक्क्यांपेक्षा जास्त होता. तर आता विकासाचा दर दहा टक्क्यांच्या पुढे जाऊ पाहत आहे.’ असे शहा म्हणाले.

लोककल्याणाची अनेक कामे सरकारने हाती घेतली आहेत. ८० कोटी लोकांना मोफत खाद्यान्नाचे वाटप केले जात असून पाच कोटी लोकांना मोफत घरांचे वाटप करण्यात आले आहे. बारा कोटी शौचालयांची बांधणी करण्यात आली आहे. ११ कोटी लोकांना मोफत वीजजोडणी देण्यात आली असून १५ कोटी लोकांपर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पोहोचविण्यात आले आहे,’ असेही शहा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.