गोमांस खाणं वाईट नाही असं सावरकरांनीच म्हटलंय - दिग्विजय सिंह

Digvijay Singh On Cow Beef
Digvijay Singh On Cow BeefSakal
Updated on

भोपाळ : ''आता काही हिंदू गोमांस खातात आणि काही खात नाहीत. काहीजण गोहत्येच्या विरोधात आहेत. पण, स्वतः सावरकरांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय, की हिंदू धर्माचा हिंदूत्वासोबत (Hindu And Hinduism) संबंध नाही. गाय स्वतःच्या मल-मुत्रामध्ये लोळतेय तर ती आपली माता कशी काय होऊ शकते? गोमांस (Cow Beef) खाणं वाईट नाही, असं स्वतः सावरकरांनी म्हटलंय. सध्या भाजप त्यांच्याच विचारावर चालतेय'', असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Congress Leader Digvijaya Singh) यांनी केलं. ते भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

Digvijay Singh On Cow Beef
काँग्रेस सावरकर-सुभाष बाबूंबद्दल भ्रम पसरवित आहे; भाजपचा आरोप

दिग्विजय सिंह यांनी भाजपला डिवचलं -

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) देखील नेहमी हिंदूत्वावरून टीका करत असतात. हिंदू आणि हिंदूत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, की एकच असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला होता. तेव्हापासून हिंदू आणि हिंदूत्वावरून भाजपवर सातत्यानं टीका केली जात आहे. हिंदूत्व ढोंगी आहे. हिंदूत्ववाद्यांमुळे देशाला, देशाच्या एकात्मेला धोका आहे, असा आरोपही राहुल गांधी केला होता. त्यानंतर आता दिग्विजय सिंह यांनी सावरकरांचे विचार सांगून भाजपला हिंदूत्वावरून आणखी डिवचण्याचा प्रयत्न केलाय. भाजप आणि आरएसएस सावरकरांना मानतात. पण, स्वतः सावरकरांनी हिंदू आणि हिंदूत्व या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, असं दिग्विजय सिंह म्हणाले.

''गाय माता कशी?'' -

''गौमाता मानणारा वर्ग देखील आहे. भाजपचे नेते गाईला माता मानतात. पण, गाय स्वतःच्या मल-मुत्रामध्ये लोळतेय तर ती आपली माता कशी काय होऊ शकते? असं स्वतः सावरकरांनी त्यांच्या पुस्तकातून म्हटलंय, असं दिग्विजय सिंह म्हणाले. तसेच गोमांस खाणं वाईट नाही'', असं स्वतः सावरकरांनी सांगितलं होतं, असंही सिंह म्हणाले.

हिंदूत्वाबद्दल सावरकर बोलले - आरजेडी

''गोमांसबद्दल सावरकर काय म्हणाले हे माहिती नाही. पण, कोणतंही जनावरं मानवाची माता कशी काय होऊ शकते? गाय तर स्वतःच्या मल-मुत्रामध्ये लोळलेली असते. मग, तिला मनुष्याची माता मानणे हे मानव धर्माचा अपमान आहे, असं सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे'', असं आरजेडी नेता शिवानंद तिवारी देखील म्हणाले. हिंदूत्व शब्दाचा पहिला शब्दप्रयोग सावरकरांनी केला. हिंदू आणि हिंदूत्व दोन्ही वेगवेगळे आहे, असं सावरकरांनी स्वतः म्हटलं होतं, असंही तिवारींनी एएनआयसोबत बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.