दोघांमध्ये कटुता होती, पण आता...; रतन टाटा–सायरस मिस्त्री संबंधांवर मोठा खुलासा

Ratan Tata and Cyrus Mistry
Ratan Tata and Cyrus Mistrysakal
Updated on

नवी दिल्ली : रविवारी कार अपघातात मृत्युमुखी पडलेले देशातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. टाटा सन्सच्या माजी अध्यक्षांच्या अकाली निधनामुळे देशातील कॉर्पोरेट जगताला मोठा धक्का बसला आहे. सायरस यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहात ब्रँड मॅनेजर असलेले मुकुंद राजन यांनी एका खास मुलाखतीत रतन टाटा यांनी आता जुने मतभेद विसरण्याची वेळ आल्याचं म्हटलं.

Ratan Tata and Cyrus Mistry
पूरपरिस्थितीची बैठक सुरू असताना झोपले कर्नाटकचे मंत्री; काँग्रेसने म्हटले...

रतन टाटा आणि मिस्त्री या दोघांमध्ये खूप कटुता निर्माण झाली होती, दुर्दैवाने अखेपर्यंत समेट होऊ शकली नाही. राजन म्हणाले, "माध्यमांमध्ये आणि न्यायालयात झालेल्या काही आरोपांमुळे टाटा खूप दुखावले गेले होते. साहजिकच या दोन्ही व्यक्तिमत्त्वांमध्ये खूप कटुता निर्माण झाली होती. तसेच दोघांमध्ये समेट होईल, अशी शक्यताही नव्हती. त्यामुळे आता भूतकाळ मागे सोडून पुढे पाहण्याची गरज आहे. रतन टाटा आणि मिस्त्री या दोघांनीही टाटांसाठी सर्वोत्तम करायचे होते.

राजन म्हणाले की, 54 वर्षीय सायरस हे मार्गदर्शक रतन टाटा यांच्याशी संबंध बिघडल्याने अत्यंत नाराज होते. 84 वर्षीय रतन टाटा यांनी सायरस यांना रोखण्यात यश मिळवले. परंतु त्यांना हटवल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अत्यंत कडव्या लढाईने संपले.

Ratan Tata and Cyrus Mistry
राजीव गांधीच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेवून राहुल गांधी करणार 'भारत जोडो'ला प्रारंभ

सायरस यांना सारखं वाटायच की, त्यांच्याविषयी रतन टाटांकडे कोणीतरी चुकीची माहिती पोहोचवली आहे. वास्तविक पाहता, टाटा समूहाविषयी त्यांच्याकडे मोठी योजना होती. मात्र टाटांकडे चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचविण्यात आली.

राजन म्हणाले की, सायरस कधीही श्रेय घेण्यासाठी धडपडत नव्हते. उलट ते श्रेय देण्यास पुढे असायचे. शिवाय टाटा यांच्या निकटवर्तीयांना वाटले की, सायरस टाटा समूहाला चुकीच्या दिशेने घेऊन जात आहे. तसेच अनेक गोष्टीचं क्षेय घेत असल्याचं वाटत असल्याने सायरस चकीत झाले होते. तसेच सायरस हे टाटा समूहाच्या मुल्यांमध्ये बदल करू इच्छित असल्याचंही टाटांच्या निकटवर्तीयांना वाटू लागले होते. सायरस हे रतन टाटा यांच्यासारखेच होते. दोघांकडेही आफाट आर्थिक कौशल्य होते, असंही राजन यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.