Narendra Modi : अंदमानच्या या २१ आयलंडना मिळाली परमवीर चक्र विजेत्यांची नाव; जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त पराक्रम दिवस साजरा केला जातो. यानिमित्त पीएम मोदींनी...
Andaman - Nicobar islands
Andaman - Nicobar islandsesakal
Updated on

दरवर्षी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त पराक्रम दिवस साजरा केला जातो. याहीवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो आहे. यानिमित्त पीएम मोदींनी अंदमान आणि निकोबार इथल्या २१ अनाम द्वीपांना २१ परमवीर चक्र पुरस्कार विजेते सैनिकांचे नाव देण्यात आले आहे. 

Andaman - Nicobar islands
Subhash Chandra Bose jayanti 2024 : खरंच गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते का?

या नामकरण कार्यक्रमाला पीएम मोदींनी व्हिडीओ कॉंफरन्सच्या माध्यमातून हजेरी लावली. यावेळी पीएम मोदींनी वीर सावरकरांचे स्मरण केले आणि सांगितले की, ते आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांना या अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगावा लागला, पण त्यांनी देशासाठी आपले शौर्य दाखवून दिले.

Andaman - Nicobar islands
Subhash Chandra Bose : नेताजींनीच गांधींना सर्वप्रथम म्हटलं होतं राष्ट्रपिता; जाणून घ्या रंजक कहाणी

यासाठी अंदमान आणि निकोबार का निवडले गेले?

पराक्रम दिवसाला अंदमान-निकोबार निवडण्याची पीएम मोदींनी त्यांच्या भाषणातून दोन मोठी कारणं सांगितली, पहिली म्हणजे इथे अशी २१ बेटे आहेत ज्यांना आजपर्यंत नाव दिलेले नाही. दुसरे कारण म्हणजे, अंदमानची भूमी ही अशी भूमी आहे जिथे देशात प्रथमच तिरंगा फडकवला गेला.  

ते म्हणाले की, भारताचे पहिले स्वतंत्र सरकार अंदमानमध्येच स्थापन झालेले.  अंदमानच्या भूमीवर वीर सावरकर आणि त्यांच्यासारख्या असंख्य वीरांनी देशासाठी बलिदान दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान लपवण्याचा प्रयत्न झाला, पण आजही त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांची आठवण करत आहे.

Andaman - Nicobar islands
Yoga At Night : शांत झोपेसाठी रोज रात्री झोपण्याआधी करा फक्त हे आसन

हे 21 परमवीर चक्र विजेते आहेत

१. मेजर सोमनाथ शर्मा: 1947 च्या युद्धात श्रीनगर एअरफील्डमधून पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावतांना शहीद

२. सुभेदार करम सिंग : १९४७ च्या युद्धात रिछमार गली येथे भारतीय चौकी वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

३. सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे: 1947 च्या युद्धात भूसुरुंग साफ करून राजौरी ताब्यात घेतली.


४. नायक जदुनाथ सिंह : ६ फेब्रुवारी १९४८ रोजी नौशेरा येथे अतुलनीय योगदान दिले.

Andaman - Nicobar islands
Pav Bhaji Sandwich : ट्राय करा असं पावभाजी सँडविच, ज्याला बनवायला पावभाजी लागतच नाही

५. हवालदार मेजर पिरू सिंग : 1947 च्या युद्धात शहीद झाले आणि 1952 मध्ये मरणोत्तर परमवीर चक्र प्राप्त झाले.

६. कॅप्टन जीएस सलारिया : काँगोमधील भारतीय शांती मोहिमेत शहीद.

७. लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा : 1962 च्या युद्धात चीनचा हल्ला अयशस्वी करून युद्धकैदीही झाले.

८. सुभेदार जोगिंदर सिंग : 1962 च्या बुमला युद्धात शौर्य दाखवले, युद्धकैदी म्हणून शहीद झाले.

९. मेजर शैतान सिंग : 1962 च्या युद्धात रेझांग ला येथे चिनी सैन्यासोबत झालेल्या लढाईत शहीद झाले.

१०. अब्दुल हमीद : 1965 मध्ये बंदूक लावलेल्या जीपने पाकिस्तानी पॅटन टाक्या नष्ट केल्या.

Andaman - Nicobar islands
Office Fashion : ऑफिस वेअरसाठी कानातल्यांची जागा घेतायत या ऑक्सिडाईज बुगड्या

११. लेफ्टनंट कर्नल एबी तारापोर : 1965 मध्ये फिल्लौरच्या लढाईत अप्रतिम शौर्याचे प्रदर्शन.

१२. लान्स नाईक अल्बर्ट एक्का : 1971 च्या युद्धात त्यांच्या युनिटच्या सैनिकांचे रक्षण केले.

१३. मेजर होशियार सिंग : 1971 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याचे हल्ले उधळून लावले.

१४. सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल : १९७१ च्या युद्धात अप्रतिम शौर्य दाखवणारे शहीद.

१५. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखॉन : 1971 च्या युद्धात श्रीनगर हवाई तळाचे रक्षण करताना शहीद

१६. मेजर रामास्वामी परमेश्वरन : 1987 मध्ये श्रीलंकेच्या गृहयुद्धात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले.

Andaman - Nicobar islands
Organza Saree Fashion : नवीन साडी विकत घेण्याचा प्लॅन आहे? ऑर्गेन्झा साडी आहे सगळ्यात बेस्ट!

१७. नायब सुभेदार बाना सिंग : 1987 मध्ये सियाचीन ग्लेशियर पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करण्यात आले.

१८. कॅप्टन विक्रम बत्रा : 1998 मध्ये कारगिल युद्धात अभूतपूर्व शौर्य दाखवून शहीद झाले.

१९. लेफ्टनंट मनोज कुमार पांडे : कारगिल युद्धात खालुबर आघाडीवर विजय मिळवताना शहीद.

२०. सुभेदार मेजर संजय कुमार : कारगिल युद्धात जखमी अवस्थेत फ्लॅट टॉपवर कब्जा केला.

२१. सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव : कारगिल युद्धात जखमी अवस्थेतही त्यांनी अप्रतिम शौर्य दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.