Viral Letter: 'Dear Indian Army' त्या दिवसाची वाट पाहतोय... वायनाड दुर्घटनेनंतर तिसरीतील विद्यार्थ्याचे पत्र होतेय व्हायरल

Waynad Landslide: विद्यार्थ्याचे पत्र पाहून लष्कर इतके प्रभावित झाले की त्यांनी स्वतः ते आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर केले आणि विद्यार्थ्याचे आभारही व्यक्त केले.
Waynad Landslide Letter To Indian Army
Waynad Landslide Letter To Indian ArmyEsakal
Updated on

वायनाडमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या विध्वंसानंतर संपूर्ण देश पीडितांसाठी प्रार्थना करत आहे. या कठीण काळात मदत आणि बचाव कार्यात आपला जीव धोक्यात घालणाऱ्या लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांचे सर्वजण कौतुक करत आहेत आणि त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

दरम्यान, इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याने लष्कराला लिहिलेल्या पत्राने लष्करासह लोकांचीही मने जिंकली आहेत. विद्यार्थ्याने लिहिले की, तो लष्कराच्या कामाने इतका प्रभावित झाला आहे की, तो मोठा झाल्यावर त्यालाही सैन्यात भरती व्हायचे आहे.

विद्यार्थ्याचे पत्र पाहून लष्कर इतके प्रभावित झाले की त्यांनी स्वतः ते आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर केले आणि विद्यार्थ्याचे आभारही व्यक्त केले.

Waynad Landslide Letter To Indian Army
DY Chandrachud: न्यायालयीन कार्यवाहीला कंटाळून लोक करतात तडजोड; CJI चंद्रचूड यांनी व्यवस्थेचा केला पर्दाफाश

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने शेअर केलेल्या पत्रानुसार, केरळच्या एएमएलपी शाळेतील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी रायनने मल्याळममध्ये लिहिले, " 'Dear Indian Army, माझ्या प्रिय वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. तुम्हाला ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना वाचवताना पाहून मला अभिमान आणि आनंद झाला. मी नुकताच तो व्हिडीओ पाहिला, ज्यात तुम्ही बिस्किटे खाऊन तुमची भूक भागवत आहात. त्या दृश्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आणि मी एक दिवस भारतीय सैन्यात सामील होऊन माझ्या देशाचे रक्षण करू इच्छितो."

Waynad Landslide Letter To Indian Army
Wayanad Landslides : भूस्खलनपीडितांसाठी नवे शहर वसविणार ; मृतांची संख्या ३४१ वर, मृतदेहांच्या शोधार्थ अत्याधुनिक रडार मागविणार

सैन्याने त्या विद्यार्थ्याचे पत्राबद्दल आभार मानले आणि त्याला छोटा सैनिक म्हटले. लष्कराच्या दक्षिण कमांडने ट्विटरवर पोस्ट केले आहे की, “तुझ्या शब्दांनी आम्ही भारावलो आहे. प्रतिकूल परिस्थितीत, आमचे ध्येय आशेचा किरण बनणे आहे. तुमच्यासारखे हिरो आम्हाला आमचे सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा देतात. तू लष्कराचा गणवेश परिधान करून आमच्यासोबत उभे राहशील त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपण सर्व मिळून आपल्या देशाचा अभिमान वाढवू. तुझ्या धैर्याबद्दल आणि प्रेरणेबद्दल धन्यवाद."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.