..हा तर संसदेचा अपमान

येत्या ऑगस्ट क्रांती दिनी (ता. ९) पीएम किसान सन्मान योजनेचा प्रत्येकी २००० रूपयांचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केला जाणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी जाहीर केले
Narendra Modi
Narendra ModiSakal
Updated on

नवी दिल्ली : पेगॅसस (Pegasus)फोन टॅपिंग प्रकरण व कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी संसदेचे अधिवेशन ठप्प पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी विरोधकांवर आज पुन्हा टीकास्त्र सोडले. ‘विरोधकांचे वर्तन हे लोकशाही, राज्यघटना व संसदेचा अपमान करणारे आहे. संसद चालू न देणे ही विरोधकांची विकृती आहे,’ अशीही भावना मोदी यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. (this a insult parliment say narendra modi)

भाजपच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज झाली. येत्या ऑगस्ट क्रांती दिनी (ता. ९) पीएम किसान सन्मान योजनेचा प्रत्येकी २००० रूपयांचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केला जाणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी जाहीर केले. गोंधळामुळे संसदीय अधिवेशन सरकार गुंडाळणार अशी चर्चा असताना पंतप्रधानांनी, संसद ठप्प करणाऱ्या विरोधकांना जनतेसमोर उघडे पाडा, असे आवाहन केल्याने हा आठवडाभर तरी अधिवेशन चालवून महत्वाची विधेयके गोंधळातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा मनसुबा असल्याचे दिसत आहे. शिवाय आज, गुरुवारी (ता. ५) आणि शनिवारी (ता. ७) आपण अनुक्रमे गुजरात, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशाच्या खासदारांशी सायंकाळी जेवणाच्या निमित्ताने चर्चा करू, असेही मोदी यांनी जाहीर केले आहे.

Narendra Modi
आरोपांत सत्य म्हणूनच सत्ताधारी गप्प : राऊत

या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्था सावरत असल्याचे सादरीकरण केले. वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) एक लाख १६ हजार ७०० कोटी रूपयांची वसूली होणे, हे अर्थव्यवस्था रूळावर येत असल्याचे द्योतक आहे, असे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त खासदारांनी ७५ गावांत ७५ दिवसांचे मुक्कामी दौरे करावे व त्याचा अहवाल दिल्लीला पाठवावा, असेही निर्देश मोदींनी भाजप खासदारांना दिले.

"देशाच्या विकासात खीळ घालण्यासाठी विरोधक संसदेत गोंधळ घालत असतील तर या विकृतीला आपण काय करू शकतो? मंत्र्यांच्या हातून कागद हिसकावणे आणि ‘पापडी चाट''सारखी हीन दर्जाची वक्तव्ये करणे हा संसदेचा अपमान आहे."

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ऑलिंपिकपटूंना खास निमंत्रण !

येत्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान सर्व भारतीय ऑलिंपिकपटूंना लाल किल्यावरील सोहळ्यास उपस्थित राहण्याचे खास निमंत्रण देणार आहेत. मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू व इतर पदक विजेत्यांसह भारतीय खेळाडूंबरोबर ते विशेष संवादही साधतील. स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाल किल्ल्यावरील कार्यक्रमास खेळाडूंना स्वतः पंतप्रधानांकडून खास निमंत्रित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.