नवी दिल्ली ः ‘‘निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला महाभ्रष्टाचार उघड झाल्यानंतर देशातील २१ सेवानिवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र हा न्यायपालिकेला धमकावण्याचा प्रकार आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी आज केला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘निवडणूक रोखे हा भ्रष्टाचाराचा अफलातून प्रकार आहे. ‘चंदा दो, धंदा लो’ या प्रकारातील हा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयामुळे उघड झाला आहे. यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. यानंतर आता काही सेवानिवृत्त न्यायाधीशांना हाताशी धरून न्यायपालिकेवर दबाव टाकण्याचा प्रकार केला जात आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या सेवानिवृत्त न्यायाधीशांची नावे वाचली तरी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून लिहिण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.’