'हा संविधानाचा अपमान'; संसदेतील विरोधकांच्या गदारोळावर PM मोदी नाराज

'हा संविधानाचा अपमान'; संसदेतील विरोधकांच्या गदारोळावर PM मोदी नाराज
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत भाग घेतला. या बैठकीत त्यांनी संसदेची कार्यवाही वारंवार ठप्प करणाऱ्या विरोधकांवर नाराजी व्यक्त केली. हा संसदेचा, संविधानाचा तसेच देशाचा अपमान असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय की, पंतप्रधान मोदींनी बैठकीदरम्यान तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या 'पापडी चाट'वालं वक्तव्य देखील अपमानजनक असल्याचं म्हटलं. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये संबोधित करताना पंतप्रधानांनी म्हटलंय की, विरोधी पक्षातील सदस्यांचं आचरण आणि त्यांचा व्यवहार हा जनतेचा देखील अपमान आहे.

'हा संविधानाचा अपमान'; संसदेतील विरोधकांच्या गदारोळावर PM मोदी नाराज
'पेगॅसस'चं सत्य बाहेर येणार? सुप्रीम कोर्टात येत्या ५ ऑगस्टला सुणावणी

मोदी यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना संसदेतील विरोधकांच्या विरोधाच्या वेळी संयम राखण्याचा आणि सभागृहाच्या सन्मानाचे रक्षण करण्याचा सल्ला दिला. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना पंतप्रधानांनी त्यांना शांतता गमावू नये असे आवाहन केले.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, काल तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने ट्विट केलं होतं. पंतप्रधान मोदींनी याला जनतेचा अपमान असं म्हटलंय. पंतप्रदान मोदींनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीय. पापडी-चाट बनवण्याचं वक्तव्य करणं अपमानजनक वक्तव्य आहे. कागद हिसकावून घेणं आणि ते तुकडे तुकडे करुन फेकून देणं. तसेच त्याबद्दल कसलीही माफी न मागणं हा प्रकार अहंकाराचं दर्शन घडवतो.

'हा संविधानाचा अपमान'; संसदेतील विरोधकांच्या गदारोळावर PM मोदी नाराज
बनावट दारु विक्री केल्यास फाशीची शिक्षा; मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सरकारवर घाईगडबडीत विधेयकं पारित करण्याचा आरोप लावला आहे. संसदेत सात-सात मिनिटांमध्ये एक विधेयक पारित केलं जात आहे.

डेरेक ओ ब्रायन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, पहिल्या १० दिवसांत संसदेत कमाल! मोदी-शाह यांनी १२ विधेयकं पारित केले आणि ते पारित करण्याचा सरासरी वेळ सात मिनिट प्रति विधेयक असा आहे. त्यांनी या प्रकारावर टीका करताना म्हटलंय की, विधेयक पारित करत आहेत की पापडी चाट बनवत आहेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.