वैद्यकीय ऑक्सिजनबद्दल सर्वकाही; आपल्याला हे माहीतच हवं

वैद्यकीय ऑक्सिजनबद्दल सर्वकाही; आपल्याला हे माहीतच हवं
Updated on

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांना ऑक्सिजनची (oxygen) गरज भासली. देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा (lack of oxygen) निर्माण झाला. यावर उपाययोजना म्हणून ठिकठिकाणचा औद्योगिक ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी (medical use of oxygen) वळविण्यात आला. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचाही (oxygen concentrator) वापर वाढत गेला. त्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजे काय? ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नक्की कसा असावा? त्याचा उपयोग काय याचा घेतलेला हा आढावा... (This is what we need to know about oxygen)

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज का लागते?

कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर तो मानवी फुफ्फुसावर हल्ला करतो. व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास त्याला फार काही त्रास होत नाही. पण तो अत्यावस्थ अवस्थेत (क्रिटिकल) पोचला की रूग्णालयात दाखल करण्याची गरज पडते. कोरोनाचे विषाणू फुफ्फुसातील अशा पेशींवर हल्ला करतात ज्या पेशी रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळवतात. पर्यायाने शरीराला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी बाहेरून वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भासते.

वैद्यकीय ऑक्सिजनबद्दल सर्वकाही; आपल्याला हे माहीतच हवं
लहान मुलांना वाचवा; जगभरात लैंगिक शोषण आणि तस्करी होते तरी कशी?

वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजे काय?

वातावरणात २१ टक्के ऑक्सिजन असतो. मात्र रुग्णाला बाहेरून ऑक्सिजन देण्यासाठी त्यापेक्षा अधिक घनता असलेल्या ऑक्सिजनची गरज असते. रुग्णाच्या फुफ्फुसाच्या क्षमतेनुसार ऑक्सिजनची घनता ठरते. द्रव वैद्यकीय ऑक्सिजन मिळविण्यासाठी कारखान्यांमध्ये रासायनिक प्रक्रियेतून शुद्ध स्वरूपाचा ऑक्सिजन मिळवून साठविलेले असतो. त्याची शुद्धता तब्बल ९९.९९ टक्क्यांपर्यंत असते. सिलिंडरमध्ये भरण्यासाठी हा ऑक्सिजन द्रव स्वरूपात उपलब्ध केलेला असतो.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय?

हवेतील ऑक्सिजन विशिष्ट पद्धतीने साठविण्याचे सयंत्र म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर. यामध्ये हवेतील नायट्रोजन बाजूला करून ऑक्सिजनची घनता वाढवली जाते. ऑक्सिजनचे वेगवेगळे प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन करणारे संयंत्र बाजारात उपलब्ध आहेत. सुमारे ९० ते ९४ टक्के घनता असलेला या द्वारे मिळतो. विजेवर चालणारे हे यंत्र सातत्याने हवेतून ऑक्सिजन मिळवून देते. त्याला सिलिंडर सारखे पुन्हा ऑक्सिजन भरण्याची गरज नाही.

वैद्यकीय ऑक्सिजनबद्दल सर्वकाही; आपल्याला हे माहीतच हवं
रॉकेट हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीय महिलेच्या कुटुंबाची इस्रायल घेणार काळजी

कोणत्या रूग्णाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज पडते?

कोरोना बाधित ‘मॉडरेट’ रूग्ण ज्याची ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यापेक्षा कमी झाली आहे. ज्यामध्ये ऑक्सिजनची गरज पाच लिटर प्रती मिनिटांची आहे. त्यापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज असल्यास थेट लिक्विड मेडीकल ऑक्सिजन सिलिंडर किंवा आयसीयुत दाखल करणे गरजेचे आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेताना काय पहाल?

आपल्याला प्रति मिनिटाला किती लिटर ऑक्सिजनची गरज आहे. तसेच त्याची शुद्धता किती अपेक्षीत आहे, त्यानुसार कॉन्सन्ट्रेटर खरेदी करा. त्याला ऊर्जा किती लागते, त्याचा आवाज किती होतो आदी छोटे मोठे पॅरामिटर आणि सर्टिफिकेशन जरूर पहावे.

(स्त्रोत : पीआयबी, डब्ल्यूएचओ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()