कोरोना लस घेतल्यावर पॅरालिसिस झाला बरा; रुग्णाचा दावा

कोरोना लस घेतल्यावर बरे होतात जुने आजार?
corona vaccination
corona vaccinationcorona vaccination
Updated on

देशात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूवर coronavirus अद्यापही कोणतं ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लस vaccine उपलब्ध झाली आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, याच काळात लस घेण्यावरुनही अनेक चर्चांना उधाण आलं आहे. लस घेतल्यावर त्याचे साईड इफेक्ट्स होतात असं अनेकांनी म्हटलं आहे.परंतु, आता कोरोनाची लस घेतल्यामुळे एका व्यक्तीचा पॅरालिसिस paralysis बरा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीने स्वत: हा दावा केला आहे. this-major-disease-cured-after-vaccine-patient-claimed

सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशमधील राजगढ जिल्ह्यातील सारंगपूर येथे राहणाऱ्या अब्दुल मजीद खान यांची चर्चा रंगली आहे.कोरोनाची लस घेतल्यामुळे त्यांचा पॅरालिसिस बरा झाला असा दावा त्यांनी केला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ते पॅरालिसिसने त्रस्त होते. मात्र, कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

corona vaccination
धक्कादायक! स्टेजवरुन उतरली नाही म्हणून बारबालेवर झाडली गोळी

पॅरालिसिस झाल्यामुळे मजीद खान यांना बोलताना किंवा घरातील लहान लहान काम करताना अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा बोलत असताना त्यांचे शब्दोच्चार स्पष्ट ऐकून येत नसे. त्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरु होते. याच काळात कोरोनाची लस त्यांनी घेतली आणि साधारणपणे अर्धा-एक तासामध्ये त्यांच्या बोलण्यात सुधारणा होऊ लागली. तसंच शरीरातील बधीर झालेल्या अवयवयांचीदेखील हालचाल होऊ लागली.

"माजीद खान यांच्या प्रकृतीत झालेली सुधारणा पाहून हा वॅक्सिनचा झालेला सायकोलॉजिक इफेक्ट, वॅक्सिनचा इफेक्ट किंवा साईड इफेक्ट असू शकतो", असं राजगढ जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सुधीर कलावत यांनी म्हटलं.

दरम्यान, कोरोना वॅक्सिन घेतल्यानंतर माजीद खान यांचे हात, पाय आणि शब्दोच्चार व्यवस्थित होत असल्यामुळे ते आता इतरांनादेखील वॅक्सिन घेण्याचं आवाहन करत आहेत. तसंच माजीद खान यांच्याप्रमाणेच मध्य प्रदेशमधील काशीराम कनोजे यांनी जुना आजार बरा झाल्याचा दावा केला आहे. काशीराम यांना १० वर्षांपासून शरीरावर खाज सुटण्याची समस्या होती. मात्र, कोरोनाची लस घेतल्यानंतर ५ दिवसांत हा त्रास दूर झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.