Women Reservation : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे 'ते' दोन खासदार कोण? का केला विरोध?

या विधेयकाच्या समर्थनार्थ ४५४ तर विरोधात फक्त २ मते पडली आहेत.
Women Reservation
Women ReservationSakal
Updated on

दिल्ली : विशेष अधिवेशन घेऊन केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक गुरुवारी (20 सप्टेंबर) लोकसभेत बहुमतानं मंजूर केलं. या विधेयकाला 454 खासदारांनी आपलं समर्थन दाखवलं तर दोन खासदारांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. लोकसभेच्या मंजूरीनंतर राज्यसभेत हे विधेयक मंजूरासाठी मांडले गेले आहे. पण विरोधकांनीही या विधेयकाला समर्थन केले असून विरोध करणारे ते दोन खासदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर अनेकांच्या नजरा कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार याकडे लागले होते. या अधिवेशनात सरकारने महिलांच्या ३३ टक्के राजकीय आरक्षणाचे विधेयक मांडले आणि मंजूरही करून घेतले.

कुणी केला विरोध?

विरोधकांनी यावेळी सरकारवर सडकून टीका केली असली तरी या विधेयकाला समर्थन दिले. तर एमआयएमचे हैद्राबाद आणि छत्रपती संभाजीनगर येथील खासदार असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. विधेयकाला विरोध करण्यासाठी त्यांनी कारणे सांगितली आहेत.

Women Reservation
Pakistan : पाकिस्तानची परिस्थिती! रेल्वे आली तरी रस्त्यावरील वाहने थांबेनात; ड्रायव्हर हॉर्न वाजवून बेजार

का केला विरोध?

महिला विधेयकाला विरोध करताना एमआयएमचे अध्यक्ष औवेसी म्हणाले की, "ओबीसी समाजाचे २२ टक्के खासदार आहेत आणि वरच्या जातींचे २३२ खासदार आहेत पण तुम्ही त्यांच्या महिलांना आरक्षण देणार नाहीत. आत्तापर्यंत ६९० महिला खासदार झाल्या. त्यापैकी फक्त २५ महिला मुसलमान आहेत. देशात ७ टक्के महिला मुसलमान आहेत. त्यापैकी लोकसभेत फक्त ०.७ टक्के एवढ्याच आहेत."

"दुसरा मुद्दा असा की, जर हा नियम लागू झाला तर मुसलमानांचे प्रतिनिधित्व लोकसभा आणि विधानसभेत कमी होईल. त्याचबरोबर ओबीसींचेसुद्धा केंद्रातील आणि राज्यातील प्रतिनिधित्व कमी होईल." असं ओवैसी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.