लोकशाहीवर विश्‍वास असणाऱ्यांनी एकत्र यावे : शरद पवार

लोकशाहीवर विश्‍वास असणाऱ्यांनी एकत्र यावे : शरद पवारांनी केले सोनिया गांधीच्या बैठकीचे केले स्वागत
sonia gandhi and pawar
sonia gandhi and pawarsakal
Updated on

नवी दिल्ली : लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर ज्यांचा विश्वास आहे, ज्यांना देशाची लोकशाही मूल्यांचे रक्षण करायचे आहे, त्यांनी आता एकत्र आले पाहिजे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. पवार यांनी ट्वीट करत कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलेल्या बैठकीचे स्वागत केले. ''सध्याच्या निराशाजनक स्थितीत ही बैठक आवश्यक होती'', असे त्यांनी म्हटले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस प्रकरण, कृषी कायदे आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारला धारेवर धरले होते. सोनिया गांधी यांनी काल आणखी एक पाऊल पुढे टाकत विरोधी पक्षांच्या नेत्यांची ऑनलाइन बैठक बोलाविली होती. या बैठकीला देशभरातील १९ पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्‍चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे एम. के. स्टॅलिन आणि झारखंडचे हेमंत सोरेन यांचा उपस्थित नेत्यांमध्ये समावेश होता.

sonia gandhi and pawar
तालिबानची तुलना वाल्मिकी ऋषींसोबत, मुनव्वर राणांविरोधात गुन्हा

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘देशातील शेतकरी अनेक महिन्यांपासून आंदोलन करीत आहे, हे भारतासारख्या देशात दुःखद चित्र आहे. आर्थिक मंदी, कोरोना, बेरोजगारी, सीमा वाद, अल्पसंख्याकांचे प्रश्न यांसारख्या अनेक प्रश्नांचा देश सामना करीत आहे. त्यावर उपाय शोधण्यात सध्याचे सरकार अपयशी ठरले आहे. लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आता सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे.त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम सुरू करायला हवा. सर्व मुद्द्यांचा एकावेळी निपटारा करण्यापेक्षा आपण प्राधान्यक्रम निश्चित करून सामूहिकपणे कार्य करायला हवे.

‘‘देशाला राज्यघटनेवर विश्‍वास असलेले सरकार देण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी योग्यपद्धतीने नियोजन केले पाहिजे.हे मोठे आव्हान आहे पण, आपण संघटितपणे त्यावर मात करू शकतो. प्रत्येकावर पक्षीय बंधने आहेत परंतु ती बाजूला ठेवून संघटितपणे उभे राहण्याची वेळ आता आली आहे.’’ अशी साद सोनिया गांधी यांनी देशभरातील विरोधी पक्षांना घातली.

sonia gandhi and pawar
हैदराबाद येथे लवकरच आंतरराष्ट्रीय 'लवाद' केंद्र

अमृत महोत्सवच योग्य वेळ :

सोनिया गांधी यांनी भाषणाच्या सुरवातीला पावसाळी अधिवेशनातील सरकारच्या अहंकारी भूमिकेवर भाष्य केले. सार्वजनिक हिताच्या मुद्द्यावरही या सरकारने चर्चा नाकारल्याची टीका त्यांनी केली. सोनिया म्हणाल्या, ‘‘आपले अंतिम उद्दिष्ट हे २०२४ची लोकसभा निवडणूक आहे. आपण नियोजनबद्ध पद्धतीने सुरवात करायला हवी.

त्यासाठी स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांवर विश्‍वास असलेले सरकार देण्याचे एकमेव उद्दिष्ट आपण समोर ठेवले पाहिजे. हे आपल्यासाठी आव्हान आहे; परंतु एकत्रितपणे आपण हे करू शकतो. त्यासाठी आपल्याला संघटितपणे उभे राहण्याशिवाय पर्याय नाही.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव त्यासाठी योग्य क्षण आहे." सोनियांच्या या बैठकीच्या निमित्ताने २००३ काँग्रेसच्या चिंतन बैठकीच्या आठवणींना उजाळा मिळाला. तेव्हाही सोनियांच्या आवाहनानंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. तत्कालीन वाजपेयी सरकारचा पराभव करण्यात काँग्रेसला यश आले होते.

sonia gandhi and pawar
'पेट्रोल स्वस्त आहे, तालिबानकडे जा', भाजप नेत्याचा VIDEO व्हायरल

आप, बसप, सप गैरहजर :

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रीय जनता दल, लोकतांत्रिक जनता दल, संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोकदल, केरळ कॉंग्रेस, पीडीपी यांसह १९ पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते. बहुतांश पक्षांनी सोनियांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाचे नेते या बैठकीपासून दूर राहिले.

''आपल्या प्रत्येकावर पक्षीय बंधने आहेत. पण देशहितासाठी त्यापुढे जाऊन विचार करावा लागेल. ती वेळ आता आली असून, आपण संघटितपणे उभे राहिले पाहिजे.'' - सोनिया गांधी,अध्यक्षा काँग्रेस

''केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना टार्गेट केले जात आहे. लोकशाही संस्थांची मोडतोड केली जात असून त्याविरोधात विरोधी पक्षांनी संघटितपणे उभे राहण्याची वेळ आली आहे.'' - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.