Crime : धक्कादायक! वकिलाला कोठडीत दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्स करण्यास भाग पाडलं, तीन पोलिसांनी अटक

Punjab Crime
Punjab Crime
Updated on

नवी दिल्ली : पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुक्तसर जिल्ह्यात एका वकिलाचा आणि कोठडीत असलेल्या अन्य एका व्यक्तीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली बुधवारी पोलीस अधीक्षक आणि अन्य दोन पोलिसांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

Punjab Crime
Crime : मी तिला माझे कपडे दिले, अन्...; बलात्कार पीडितेच्या मदतीला धावलेल्या व्यक्तीने सांगितला घटनाक्रम

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, छळाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी लुधियानाचे पोलीस आयुक्त मनदीप सिंग सिद्धू यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरिक्त पोलीस महासंचालक (इंटेलिजन्स) या एसआयटीवर लक्ष ठेवतील आणि इतर तीन पोलीस त्याचे सदस्य असतील. पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतल्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

Punjab Crime
Ganpati Visarjan 2023: पुण्यात विसर्जन मिरवणुकीला जाताय? गाडी कुठे पार्क करायची दर्शनाची चांगली जागा कोणती? जाणून घ्या सर्व काही

सोमवारी एका वकिलाचा छळ केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षकांसह सहा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्तसर येथील एका वकिलाला त्याच्या सहआरोपीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

एफआयआरनुसार, मुक्तसरचे पोलीस अधीक्षक (तपास) रमणदीप सिंग भुल्लर, निरीक्षक रमन कुमार कंबोज, कॉन्स्टेबल हरबंस सिंग, भूपिंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग आणि होमगार्ड दारा सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो

लीस अधीक्षक भुल्लर, निरीक्षक रमणकुमार कंबोज आणि कॉन्स्टेबल हरबंस सिंग यांना अटक करण्यात आली आहे. एसआयटी वकिलाने केलेल्या कोठडीतील छळाच्या आरोपाची चौकशी करेल आणि त्याचा अहवाल संचालक (इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) यांना सादर करणार आहे.

पीडित वकिलांनी पोलिस पथकावर हल्ला करून अधिकाऱ्यांचे कपडे फाडले, अशी तक्रार रमन कुमार कंबोज यांनी केली होती. त्यानुसार संबंधित वकिलाला १४ सप्टेंबर रोजी अन्य एका व्यक्तीसह अटक करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.