लखनऊ- उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये एका मुस्लीम महिलेला सासरच्यांनी अतोनात छळल्याचं समोर आलं आहे. महिलेला तीन तलाक (Triple talaq) देण्यात आला, तसेच तिला दिरासोबत हलाला करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. अधिक तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न २५ डिसेंबर २०२३ रोजी झाले होते. लग्नानंतर जेव्हा ती घरी आली तेव्हा तिला कळालं की तिच्या पतीचं अगोदर एक लग्न झालेलं असून त्याला पाच मुलं आहेत. असे असताना नाईलाज म्हणून महिला पतीसोबत राहू लागली. पण, त्यानंतर तिच्यावर सासरच्यांकडून अत्याचार सुरु झाले. महिलेने आरोप केलाय की, तिला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. (Muslim woman complaint in police up gonda)
एक आठवड्यापूर्वी महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पण, गुरुवारी हे प्रकरण समोर आले. सासरच्यांनी महिलेकडे एक बाईक आणि एक लाख रुपये देण्याची मागणी केली होती. यावरुन तिला मारहाण सुरु झाली होती. १० डिसेंबर रोजी पतीने महिलेला मारहाण करत तलाक दिला आणि तिला घराबाहेर काढलं. महिलेने याप्रकरणी १८ डिसेंबरला पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मध्यस्ती करत महिलेला परत सासरी पाठवलं.
महिला जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिला घरी घेण्यात सुरुवातीला नकार देण्यात आला. त्यानंतर १ जानेवारी २०२४ रोजी दिरासोबत तिचा हलाला करण्यात आला. १० जानेवारी रोजी तिच्या पतीने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. ती दोन महिन्याची गरोदर असल्याचं कळालं. त्यानंतर तिला गर्भपात करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. हुंड्यासाठी तिच्यावर अत्याचार सुरुच होते.
महिलेने दावा केलाय की, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सासरच्यांनी तिच्या गळ्यात दोरी टाकून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पण, तिने आरडाओरडा केल्याने शेजारी मदतीला धावले. शेजारी परत गेल्यानंतर पुन्हा तिला मारहाण करण्यात आली. दिरानेही तिला तीन तलाक दिला आणि तिला घराबाहेर काढलं. महिलेच्या जबाबावरुन तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.