Firecracker Factory : फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू; महिलेसह तिघे गंभीर

मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत करावी - बसवराज बोम्मई
Fire Incident Firecracker Factory Haveri
Fire Incident Firecracker Factory Haveriesakal
Updated on
Summary

अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि २५ कर्मचाऱ्यांनी सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

बंगळूर : हावेरी (Haveri) जिल्ह्यातील अलादकट्टी गावात मंगळवारी सायंकाळी फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. गोदामाच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेसह तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

द्यामप्पा ओलेकर (वय ४५), रमेश बारीक (वय २८) आणि काटेनहळ्ळी गावातील शिवलिंग अक्की (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. हरिहर तालुक्यातील तेगिनकेरी येथील ३२ वर्षीय वसीम शफी अहमद याने आगीपासून वाचण्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. त्याच्यासोबत शेरू मलप्पा कट्टीमणी हा आणखी एक कामगार जखमी झाला आहे.

Fire Incident Firecracker Factory Haveri
Highway Accident : आनंदाच्या क्षणीच काळाचा घाला! रक्षाबंधन करून परतताना अपघात; सहा वर्षांच्या चिमुरडीसह दाम्पत्य गंभीर

गोदामाच्या शेजारी राहणाऱ्या कलावती के. एस. या महिला धुरामुळे आजारी पडल्या आणि तिला हवेरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे गोदाम हावेरी येथील वीरेश सतेनहळ्ळी यांच्या मालकीचे आहे. त्याने गणेशोत्सव आणि दीपावली दरम्यान विक्रीसाठी एक कोटींहून अधिक किमतीचे फटाके खरेदी केल्याचे सांगितले जाते.

Fire Incident Firecracker Factory Haveri
HD Kumaraswamy : कर्नाटकच्या 'या' माजी मुख्यमंत्र्यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती बिघडताच तात्काळ हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

हे गोदाम हावेरी-हनगल मुख्य मार्गावरील अलादकट्टी गावात आहे. गोदामाशेजारी त्यांनी दुकानही उघडले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि २५ कर्मचाऱ्यांनी सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मालकाला अटक केली आहे.

Fire Incident Firecracker Factory Haveri
'पाकिस्तानचं समर्थन अन् हिंदू देवतांचा अपमान'; आक्षेपार्ह मजकूर व्हायरल होताच कणकवलीत तणाव, राणेंनी गाठलं थेट पोलिस स्टेशन

मदतीची बोम्मईंची मागणी

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, अधिकाऱ्यांनी अशा धोकादायक ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवले पाहिजे. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.