Tiranga Rally : तिरंगा रॅली खासदारांची पण, चर्चा स्मृती इराणीच्या स्कूटीची

लाल किल्ल्यावरून खासदारांच्या तिरंगा बाइक रॅलीला झाली सुरवात
Smruti Irani
Smruti Irani esakal
Updated on

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर स्कूटीवरील राइडचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारही स्कूटीवर बसलेल्या दिसत आहेत. स्मृती इराणी यांनी पवारांना त्यांच्या कार्यालयापर्यत लिफ्ट दिली. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करत इराणी यांनी लिहिले की, 'तिरंगा यात्रेने दिवसाची अप्रतिम सुरुवात केल्यानंतर डॉ. भारती पवार यांनी कार्यालय सोडले'.

स्मृतींनी स्कूटीवरून पुर्ण केली तिरंगा यात्रा

व्हिडिओमध्ये इराणी लाल रंगाची साडी परिधान केली आहे. त्यांनी हेल्मेट आणि चष्मा घातलेला दिसत होता. त्याचवेळी आरोग्य राज्यमंत्री भारती पवार स्कूटीवर मागे बसलेल्या आणि त्यांच्या हातात राष्ट्रध्वज आहे. केंद्र सरकार आणि भाजप ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवून स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहेत. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल यांनी मंगळवारी लाल किल्ल्यावरून खासदारांच्या तिरंगा बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

तिरंगा रॅलीदरम्यान इराणी म्हणाल्या की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने देशातील प्रत्येक नागरिक आनंद साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असा आहे की, पुढील २५ वर्षे संकल्पांनी भरलेली, कर्तव्यांनी भरलेली असावीत आणि प्रत्येक भारतीयाने अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. तिरंग्याची शक्ती 130 कोटी भारतीयांना एकत्र करण्याची आहे. आज सर्वजण एकजूट होऊन तिरंगा यात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Smruti Irani
National Flag: जाणून घ्या, तिरंगा फडकवण्याचे 'हे' नियम

सहा तासांत ५३ हजार लाइक्स, एकता कपूरने केली कमेंट

अवघ्या सहा तासांत या व्हिडिओला 53,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर मंत्र्याचे अनेक अनुयायी सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. त्यापैकी एक म्हणजे चित्रपट निर्माती एकता कपूर, जिने इराणीच्या लूकवर भाष्य केले आहे, "किती स्लिम आणि फिट आहात." तर अभिनेत्री दिव्या सेठ म्हणाली, "किती सुंदर."

31 जुलै रोजी स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हर घर तिरंगा" चळवळीची घोषणा केली होती. त्यांनी नागरिकांना 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान सोशल मीडियावर "तिरंगा" प्रोफाइल पिक्चर म्हणून वापरून जनआंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. 'हर घर तिरंगा' मोहीम 'आझादी का अमृत महोत्सव' चा एक भाग आहे, ज्याचा उद्देश भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने लोकांना 'तिरंगा' घरोघरी फडकवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

Smruti Irani
National Flag: PM मोदींनी डीपीला लावला तिरंगा; जनतेलाही केलं आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()